ठाणे

शिवसेनेचा भाजपला दे धक्का… भाजपच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

डोंबिवली ( शंकर जाधव ) : भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले.भाजपला हा मोठा धक्का असून पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूका शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे दिसते.

  भाजपचे माजी महेश पाटील,माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील आणि सायली विचारे यांसह अनेक अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रकृती चांगली नसल्याने डॉ. सुनिता पाटील या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत या सर्वांनी आपल्या हाती शिवबंधन बांधले. आगामी केडीएमसी निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेने भाजप धक्का दिल्याने भाजपमध्ये अवस्था पसल्याचे दिसते.याबाबत आमदार रविंद्र चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, ‘आम्ही कुठे तरी कमी पडलो’ अशी खंत व्यक्त करत त्यांनी या नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत.

    माजी नगरसेवक महेश पाटील हे भाजपला राम राम करणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र शिवसेनेत प्रवेशाची तारीख गुलदस्त्यात असल्याने सर्वाना उत्सुकता लागली होती.महेश पाटील यासह आणखी दोन नगरसेवक व भाजप पदाधिकारी संजय राणे यांनी जाहीर प्रवेश केल्याने कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे ताकद आणखीच वाढणार आहे.याबाबत माजी नगरसेवक पाटील यांना विचारले असता ते म्हणाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कामाची पद्धत आणि त्याच्या कार्यामुळे शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षात कार्यकर्ता म्हणून समाजसेवा करत राहीन.  

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!