मुंबई

सतर्क महिला रेल्वे कर्मचाऱ्यामुळे वाचले महिला प्रवाशाचे प्राण.

मुंबई, ता 22 नोव्हे, (संतोष पडवळ) – भायखळा रेल्वे स्थानकावरील ही घटना चालती लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात महिला तोल जाऊन पडल्याची घटना समोर आली आहे.  भायखळा स्टेशनवर उभी असलेली एक महिला धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तोल गेल्याने ती ट्रेनच्या दरवाजामधून खाली पडली. महिला तोल जाऊन पडल्याचे लक्षात येताच, तिथे उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचारी सपना गोलकर यांनी धावत जाऊन या महिलेला बाजूस केले.

 सपना गोलकर यांच्या प्रसंगावधानामुळे या महिलेचे प्राण वाचले आहेत. रेल्वे विभागाच्या वतीने ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे. सोबतच संबंधित घटनेचा एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!