ठाणे

मोबाईल चोरट्याचा पाठलाग करून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने पकडले

डोंबिवली ( शंकर जाधव ) : रेल्वे गाडी सुरु झाल्यावर प्रवाश्याच्या हातातील मोबाईल घेऊन रेल्वे फलाटावरून पळणाऱ्या चोरट्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने पाठलाग करून रंगेहात पकडले.अटक केलेल्या मोबाईल चोरटा सराईत आहे.

      मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद सुखरुद्दिन जाकीर शेख असे अटक केलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव असून तो मुळचा झारखंड येथील राहणारा आहे. शनिवारी फिर्यादी शिवाजी विष्णू बोगार्डे ( वय-५७  वर्षे) यांनी रात्री २ वाजता स्टेशनवर कामानिमित्त कसारा धीमी लोकल पकडली.२ वाजून २४ मिनिटांनी  कोपर स्टेशनवर चालायला लागलो.संधीचा फायदा घेत चोरट्याने बोगार्डे यांच्या मोबाईल खेचून पळत काढला.बोगार्डे यांनी आरडा-ओरड केल्यावर रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कॉन्स्टेबल प्रतिभा शर्मा, एमएसएफ कर्मचारी अक्षय ईश्वर येळकर आणि जीआरपी कर्मचारी पीसी  यादव यांनी आरोपीचा पाठलाग केला.चोरटा रेल्वे स्थानकाबाहेर पळत असताना चोरट्याला पोलिसांनी अटक केली.अटक आरोपीला रेल्वे पोलिसांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.रेल्वे सुरक्षा बलाच्या या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक हरफुलसिंग यादव यांनी कौतुक केले आहे.   

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!