ठाणे

शिवसेनेच्या प्रयत्नांना यश…बीएसयूपी प्रकल्पातील लाभार्थ्यांना मिळणार घरे

डोंबिवली ( शंकर जाधव ) : खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे मागणीनुसार राज्य सरकारच्या वतीने नगर विकास मंत्री व पालक मंत्री एकनाथ शिंदे  यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत बीएसयूपी प्रकल्पातील लाभार्थ्यांना घरे देण्याचे मान्य केले.यावेळी खासदार डॉ.शिंदे, स्थायी समितीचे माजी सदस्य तथा युवा सेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे, शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

   गोरगरीब जनतेला अगदी मोफत घर उपलब्ध व्हावे अशी प्रामाणिक इच्छा खासदार डॉक्टर शिंदे यांची होती. आज अनेक विकास प्रकल्पात बाधित असलेल्या गोरगरीब लोकांना महानगरपालिकेकडे अशी घरे देण्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे तसेच बीएसयूपी या केंद्र व राज्य सरकार सरकारच्या योजनेतील साडेचार हजार घरे रिक्त असून या घरांचे काही अटी व नियम शिथिल करून म्हणजेच लाभार्थींचा या घरांसाठी द्यावयाला लागणारा आर्थिक हिस्सा ही अट शिथिल करून अगदी मोफत हे घर आता रस्ता रुंदीकरण व इतर विकास प्रकल्पात ज्यांची घरे गेली आहेत त्यांच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या आणि घरांपासून पासून वंचित राहिलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील साधारण तीनशे ते चारशे  प्रकल्पग्रस्त कुटुंबांना आता लवकरच घरे उपलब्ध होणार आहे.  खासदार डॉक्टर  शिंदे  व  पालकमंत्री तथा नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांनी आभार मानले आहे. 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!