डोंबिवली ( शंकर जाधव ) : करोना प्रदुभाव कमी होत असताना हळूहळू दैनदिन जीवन पूर्वपदावर आले आहे.मात्र पालिका प्रशासने गेल्या दीड वर्षापासून डोंबिवलीतील क्रीडा संकुलातील तरणतलावाकडे लक्ष दिले नसल्याने दुरवस्था झाल्याचे दिसते.युवा सेनेचा पदाधिकाऱ्यांनी तरणतलावाची पाहणी केल्यावर प्रशासनाच्या दुर्लक्षितपणावर नाराजी व्यक्त केली.जर पालिका तरणतलावाची साफसफाई करत नसतील तर युवा सेना तलावाची स्वच्छता करेल असे सांगितले.
युवा सेना उपजिल्हा अधिकारी आशुतोष ( आशु ) सिंह यासह पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली पूर्वेकडील ह.भ.प.सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथील तरणतलावाची पाहणी केली.तरणतलावात घाण झालेल्या पाण्याच्या बोटल तरंगणताना दिसल्या. तर अनेक दिवसांपासून तरणतलावाची स्वच्छता केली नसल्याचे निदर्शनात आले.
याबाबत युवा सेना पदाधिकारी दिपेश म्हात्रे म्हणाले,सुमारे गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा काळ असल्यामुळे अनेक खेळाडुंचा हिरमोड झाला होता.मैदान व इतर सरावाच्या यंत्रणा बंद असल्याने खेळाडूंमध्ये नाराजी होती.मात्र आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.त्यामुळे डोंबिवली पूर्वेकडील सावळाराम महाराज क्रीडा संकुलानजीक असलेला तरण तलावही बंद ठेवण्यात आला होता.या तलावाची आता दुर्दशा झाली आहे.त्यामुळे तलाव लवकरात लवकर स्वच्छ करावा अन्यथा युवासेना तलावाची स्वच्छता करेल.तरण तलावात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे.युवासेनेने नुकतीच या तलावाची पाहणी केली.मात्र काही अटी घालून राज्य शासनाने तरणतलाव सुरू करण्यास परवानगी दिली आहे.त्यामुळे अटी – शर्तीचं पालन करून हा तलाव सुरू करावा अशी आग्रही मागणी पत्राद्वारे युवासेनेने पालिका प्रशासनाला पत्राद्वारे केली आहे.विशेषतः शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी पोहण्यासाठी गर्दी होत होती.तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटू देखील या ठिकाणी सराव करत होते.