ठाणे

वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे डॉ.सिंग यांना परत मिळाला मोबाईल…

 डोंबिवली ( शंकर जाधव ) : कर्तव्यावर असताना सामाजिक बांधिलकी जपणे पोलिस जपत असतात.डोंबिवलीतील  वाहतूक पोलिसांना सतर्कता दाखवल्याने रिक्षात विसलेला मोबाईल डॉक्टरांना परत मिळाला. वाहतूक पोलिसांच्या या कामाचे वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी केले.

डोंबिवलीतील बाज आर. आर. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता सिंग यांनी  बुधवार २४ तारखेला  सकाळी 10 वाजण्याच्या पूर्वेकडील नेहरू मैदान जवळ रिक्षात बसल्या. रिक्षाने रुग्णालयात जात असताना  येथ मोबाईल रिक्षामध्ये विसरल्या.रिक्षातुन उतरल्यावर रुग्णालयात गेल्यावर डॉ.सिंग यांना आपण रिक्षातच मोबाईल विसल्याचे लक्षात आले.त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मोबाईल वरून आपल्या मोबाईलवर कॉल केला.मात्र त्यांचा मोबाईल  स्वीच ऑफ होता. डॉ.सिंग यांनी वेळ न दवडता  तात्काळ डोंबिवली वाहतूक शाखेत  येथे संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई स्वप्नील जाधव यांनी त्या रोडवरील साई पारिजात सोसायटी,  गुरू छाया सोसायटीचे  सीसीटीव्ही फुटेज तपासले.  पंरतु कॅमेरा व रोडवरील अंतर जास्त असल्याने रिक्षा क्रमांक दिसत नव्हता. डॉ.सिंग यांनी केलेली  रिक्षा व रिक्षा चालकाच्या वर्णनावरून रिक्षा चालकाचा शोध घेतला.अखेर वाहतूक पोलिस जाधव यांच्या प्रयत्नांना यश आले.जाधव यांनी सदर रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याच्याकडील डॉ. सिंग यांच्या मोबाईल घेऊन रुग्णालयाच्या प्रतिनिधीच्या ताब्यात दिला.

जाधव यांच्या कामगिरीची माहिती पोलीस निरीक्षक गित्ते यांनी वरिष्ठांना माहिती दिली.तर डोंबिवली वाहतूक शाखेच्या या तत्परतेबद्दल रुग्णालयाचे संचालक डॉ. आमिर कुरेशी व डॉ. श्वेता सिंग यांनी आभार मानले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!