ठाणे

प्रभाग कार्यालयात भरणार जनता दरबार

डोंबिवली ( शंकर जाधव )  : नागरिकांना त्यांच्या विविध कामासाठी  महापालिका मुख्यालयात वारंवार यावे लागू नये म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी, त्यांच्या तक्रारींचे निवारण त्वरेने करणेकामी तसेच त्यांच्या निवेदनांवर कार्यवाही करणेसाठी आता आठवडयातील एक दिवस नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित केला आहे. विभागीय उपआयुक्तांनी त्यांच्या अखत्यारीतील प्रभाग कार्यालयात थांबुन नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणेबाबत निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

अ प्रभाग–बुधवार–दुपारी ३ ते ४, ब प्रभाग– गुरुवार–दुपारी ४ ते ५ , क प्रभाग– मंगळवार दुपारी ३ ते ४ जे प्रभाग- बुधवार–दुपारी ४ ते ५ , ड प्रभाग– बुधवार–दुपारी  ३ ते ४ , फ प्रभाग–बुधवार –दुपारी ३ ते ४ , ह प्रभाग- गुरुवार-दुपारी  ३  ते ४ , ग प्रभाग– गुरुवार – दुपारी ४  ते ५ , आय प्रभाग–गुरुवार –दुपारी ४  ते ५ , ई प्रभाग– शुक्रवार – दुपारी ४  ते ५  अशी जनता दरबाराची रुपरेषा आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!