भारत

महाराष्ट्रातील 9 दिव्यागांसह सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकला वर्ष 2020 चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, 01 :   महाराष्ट्रातील 9 दिव्यागांसह सर्वाजनिक बांधकाम विभाग नाशिक शहराला वर्ष 2020 चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांचे वितरण 3 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते होणार आहेत.

            दरवर्षी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्कार’ प्रदान केले जातात. यावर्षी 3 डिसेंबर 2021 रोजी विज्ञान भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.  यावर्षी महाराष्ट्रातील 9 दिव्यांगासह सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकला विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

            सांगलीच्या डॉ. पुनम  अण्णासाहेब उपाध्ये, मुंबईच्या निक‍िता वसंत राऊत यांना ‘उत्कृष्ट कर्मचारी’ या श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. दिव्यागांसाठी उत्कृष्ट काम करणा-या ‘वैयक्तिक  आणि संस्थांच्या श्रेणी’ मध्ये सनिका बेदी यांना ‘उत्कृष्ट वैयक्तिक (व्यावसायिक )’ श्रेणीतील  पुरस्कार जाहीर झालेला आहे.

चलन अक्षमता (चालण्यातील अक्षमता, पेशीय अक्षमता, बटुत्व, एसिड अटैक पीड़ित, बरा झालेला कुष्ठ रोग, मस्तिष्क पक्षाघात) या श्रेणीतील ‘रोल मॉडेल’ चा  पुरस्कार लातूरचा  प्रिती पोहेकर, कोल्हापूरचे देवदत्ता माने  यांना जाहीर झाला आहे. या श्रेणीतील दृष्टीदोष असणा-या मुंबईतील नेहा पावसकर, नागपूरचे राजेश औस‍दानी,  श्रवण दोष असणारे औरंगाबादचे सागर राजीव बडवे, बौध्दिक अक्षमता या श्रेणीत ‘रोल मॉडेल’ म्हणुन कोल्हापूरचा प्रथमेश दाते, याच श्रेणीत मूळची महाराष्ट्राची असलेली सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेली देवांशी जोशी यांनाही जाहीर झालेला आहे. दिव्यागांसाठी  सुगम्य  वातावरण निर्म‍िती या श्रेणीत नाश‍िक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला पुरस्कार जाहीर झाला आहे. यासह क्रीडा श्रेणीतील ‘उत्कृष्ट क्रिडा खेळाडू’चा पुरस्कार कोल्हापूर ची वैष्णवी सुतार यांना जाहीर झालेला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!