ठाणे ब्युटी टिप्स

मराठमोळ्या रंगभूषाकाराने केली कमाल ! मेकअप मधील अडचणी सोडवण्यासाठी काढली नवीन कंपनी ?

कल्याण (संजय कांबळे) : गेली १८ वर्षे बॉलीवूड मेकअप आर्टिस्ट म्हणून मराठी हिंदी तेलगू आणि इंटरनॅशनल फॅशन क्षेत्रात प्रथम श्रेणीचे रंगभूषाकार/ मेकअप आर्टिस्ट म्हणून नाव कमावलेले मराठमोळे संजय प्रभाकर खराडे  यांनी या क्षेत्रात येणाऱ्या विविध अडचणी, समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी चक्क एक कंपनीच सुरू केली असून त्याच्या माध्यमातून अनेकांना मेकअप आर्टिस्ट होण्याचे स्वप्न पुर्तीचे व्दारे खुली केली आहेत.त्यामुळे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  सोलापुरात जिल्ह्यात तालुका करमाळा मूळ गाव असलेल्या मुंबईत जन्मलेले संजय प्रभाकर हे उत्तम कलाकार व प्रशिक्षक आहेत.

        इंटरनॅशनल फॅशन मेकअप हेअर आणि बॉडी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायच्या अफाट शैलीमुळे भारताच्या बऱ्याच सुप्रसिद्ध मासिकांच्या मुखपृष्टा द्वारे लॉस एंजलिस आणि किमान ४८ देशांमध्ये त्यांचे नाव प्रसिद्ध आहे.

मेकअप चा कोर्स करणे हे काहींसाठी तर फक्त स्वप्नच असते. अशा ३५ गरीब मुलींची स्वप्नपूर्ती करत एकही पैसा न घेता मोफत शिकवणारे संजय खराडे स्वतः मेकअप आर्टिस्ट असून मास्टर बास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पासून ते विनोदाचा बादशहा जाँनी लिव्हर अशा शेकडो सेलिब्रिटी च्या आयुष्यात त्यांनी रंग भरले आहेत. परंतु इतकी कामे करताना एक समस्या त्यांच्या मनात सतत भेडसावत होती ती म्हणजे यातील उत्पादन?. लॉक डाऊन मध्ये मिळालेल्या वेळात त्यांनी त्या समस्येवर तोडगा काढायचे ठरवून एक नवीन उत्पादन सुरु करायचे ठरवले.

२०२१ संपता-संपता या उत्पादनास प्रत्यक्षात बाजारात उतरवण्यासाठी खूपच अडचणींचा सामना करावा लागला.

रंगभूषाकार मेकअप करत असताना वापरात आणलेले ब्रश व इतर साहित्य त्यावेळी रोजच साबणाने अथवा शाम्पू आणि ऑइल च्या मिश्रणाने क्लीन करत असत आणि ते ब्रश सुकायला

किमान दोन दिवस तरी लागत असत त्यामुळे ब्रश सुकवण्यासाठी हेअर स्टायलिंग साठी वापरला जाणारा ब्लो ड्रायर वापरत असत.

अथवा ब्रश चा डबल किट विकत घ्यावा लागत असे.

साबण , शाम्पू ने धुतलेले ब्रश मधून ओलावा पूर्णपणे न सुकता,  वास येणे ब्रश खराब होणे ब्रसेल्स सेल होणे, नवीन बॅक्टेरिया लवकरच डेव्हलप होण्याची भीती, जे स्किन साठी घातक ठरू शक ते.

मार्च २०२० च्या लाँकडॉउन मध्ये एका गुगल परीक्षणात एका गुगल सर्वेनुसार झालेल्या परीक्षणात

३१%लोकांना ब्रश क्लीन करतात किंवा करायचे असतात हे माहीत नाही.

२१% लोकांना गरजेचे वाटत नाही.

२२% म्हणतात खूप वेळ लागतो क्लीन करायला.

आणि

फक्त १९ टक्के लोक काही दिवसांनंतर नवीन ब्रश खरेदी करतात.

आजही १००% लोकांपैकी ८५ % लोक घरात उपलब्ध असलेले  पाणी , शाम्पू , डिश वॉश साबणआणि ऑईल यांचा वापर करून ब्रश अथवा टूल किट साफ करतात.

सर्वोत्तम मेकअप करायचा चढाओढीत ग्राहक महागडे ब्रशेस खरेदी करण्यासाठी लक्षणीय किंमत मोजत असतात. पण त्यापैकी बऱ्याच लोकांना त्यांची काळजी घेणे आणि सांभाळ करणे येतच नसते अथवा माहीत नसते.

वरील सर्वेक्षणाच्या निरीक्षणानंतर सर्व युजर्सना आपला वेळ कसा वाचवायचा ब्रश ची छान प्रकारे काळजी कशी घ्यावी याचे महत्त्व शिकवण्याची प्रथम गरज आहे असेही दिसले .

संजय खराडे स्वतः मेकअप आर्टिस्ट असल्याने या गोष्टीला आपण पुढे नॆउ असे विचार करून तयारीस लागले.

दिवस-रात्र बऱ्याच अडीअडचणींना तोंड देऊन त्यांनी लॅब टेस्टेड प्रमाणपत्र असलेले क्लीन-ऒ-मेकअप नावाचे एक प्रॉडक्ट बाजारात आणले

Instant drawing formula disinfectant 

bacteria ,fungus and virus killer.

असे हे अतिशय महागडॆ सेंट वापरून बनवलेले एक उच्च प्रतीचे प्रोफेशनल ब्रश क्लिनर बनवले. जे अतिशय महागड्या मेकअपच्या ब्रशेस आणि इतर वस्तूना हायजेनिक, लॉंग लास्ट आणि सुगंधित ठेवेल.

सगळीच मित्रमंडळी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित मेकअप आर्टिस्ट असल्याने प्रथमदर्शनी सॅम्पल चा प्रतिसाद लगेचच आणि चांगलाच मिळाला.

ब्रँडेड आणि हाय क्वालिटी मेंटेन,  लक्झरी फ्राग्रन्स असले तरीही किंमत ही मध्य मच शिवाय मेड इन इंडिया असल्याने ही बातमी बॉलीवूड मध्ये वार्‍यासारखी पसरली.

वर्षे २०२१ चा शेवटपर्यंत बॉलीवूड ते हैदराबाद सिनेसृष्टी पर्यंत सर्वांच्या पसंतीस पडलेले हे उत्पादन जवळपास प्रत्येकाकडे दिसू लागले आहे.

सिनेसृष्टी सह ब्रायडल मेकअप आर्टिस्ट यांनी पण इन्स्टंट ब्रश क्लिनर चा वापर करण्यास सुरुवात केली तर ग्राहक वाढतील व कमाई पण दुप्पट होईल.

मेकअपचा व मेकअप आर्टिस्ट चा दर्जा वाढवण्यास आपण सर्वांनीच सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे असे संजय खराडे यांचे म्हणणे आहे.शिवाय यातून नवनवीन साधनांचा वापर केला तर मराठी, हिंदी, तेलगू, बाँलीवुड क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल असे ही त्यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!