कोकण

ऑर्केस्ट्रा स्वरगंधने अल्पावधीतच संगीत रसिकांची मने जिंकली – सौ.स्मिता ऋषिनाथ पत्याणे

स्वराज्य प्रतिष्ठान लांजा परिवारातर्फे लवकरच होणार कलाकारांचा सत्कार 

कोकण (दिपक मांडवकर /शांताराम गुडेकर)  :   रत्नागिरी येथील संगीत सह्याद्री निर्मित आणि यासिन नेवरेकर आणि राकेश मोरे प्रस्तुत ऑर्केस्ट्रा स्वरगंध हा अल्पावधीतच संगीत रसिकांच्या मनावर आपल स्वतःच असं वेगळं स्थान निर्माण करत संगीत रसिकांची मने जिंकत आहे. संगीत सह्याद्रीचे ज्येष्ठ गायक आणि संगीत क्षेत्रातील प्रेरणास्थान यासिन भाई नेवरेकर  आणि राकेश मोरे यांच्या सुमधुर आवाजाने रसिक प्रेक्षक अक्षरशः तल्लीन होतात.

त्यावेळी त्यांच्या सोबत जेष्ठ गायिका आणि भजन क्षेत्रामध्ये ज्यांच नाव आहे त्या सर्वता ताई चव्हाण, गायिका प्रिया अरुण, विनय नागवेकर, पत्रकार नरेश पांचाळ, भूषण बर्वे , दीपक नाखरेकर आदी सहकलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करत असताना कार्यक्रमाच्या निवेदनाची उत्तम बाजू भक्कम पणे विनायक खानविलकर हे सांभाळत असतात . या कार्यक्रमामध्ये लावणी , मिमिक्री आणि इतर बरच काही लोकांना पाहायला मिळत असल्यामुळे या कार्यक्रमासाठी लोकांची मागणीही खूप असते.

अशा या ऑर्केस्ट्रा स्वरगंधने अल्पावधीतच संगीत रसिकांची मने जिंकली आहेत असे मत यनिमित्ताने सौ.स्मिता ऋषिनाथ पत्याणे यांनी बोलताना व्यक्त केले.लवकरच स्वराज्य प्रतिष्ठान लांजाचे संस्थापक आणि महाराष्ट्रातील तरुणांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री ऋषिनाथ दादा पत्याणे, प्रमिल पत्याणे आणि कुटुंबियांच्या या सर्व कलाकारांचे सन्मान करण्यात येणार आहेत. स्वराज्य प्रतिष्ठान लांजा परिवाराच्या ऑर्केस्ट्रा स्वरगंध ग्रुपला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

महाराष्ट्र

पंचायत राज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे प्रयत्न; ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!