ठाणे विश्व

कल्याण –डोंबिवलीत २९ मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात

    डोंबिवली ( शंकर जाधव ) : मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवा आणि अनधिकृत मशिदीवरील भोंग्यांचा आवाज न्यायालयाच्या आदेशानुसार ठरविलेल्या डेसिबल मध्ये असावा असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील जाहीर सभेत सांगितले.न्यायालयाच्या नियमांचे पालन करणाऱ्या मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसाचे पठण ककरू असा इशारा दिला होता.४ मे पासून मनसैनिक हनुमान चालिका पठन करतील असे जाहीर करताच राज्य सरकारने मनसैनिकांना नोटीसा बजावल्या. मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांसह ९८ मनसैनिकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या. बुधवारी पोलिसांनी कल्याण-डोंबिवलीतील ३९ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.          

     महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पासुन मशिदीवरील भोंगे काढुन टाकणेबाबत चेतावणी दिली आहे.तसे न केल्या अजानच्या वेळी मशिदीसमोर लाउडस्पीकर लावुन हनुमान चालीस पठण करण्याचे आवाहन केले होते. याबाबत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मनाई आदेश लागु करण्यात आला आहे. सदर मनाई आदेशामध्ये पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीरसभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई केली आहे. पोलीस उप आयुक्त विशेष शाखा ठाणे यांनी २८ एप्रिल अन्वये फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३चे कलम १४४ नुसार दिनांक २९ एप्रिल  सकाळीपासुन ते दिनांक २७ जून पर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मनाई आदेश लागु केला आहे. मानई आदेशात कोणत्याही धार्मिक स्थळा पासुन २०० मीटर परिसरात सार्वजनिक रितीने बेकायदेशिर जमाव करणे,घोषणावाजी करणे, गायन करणे, वाद्य वाजविने,  विनापरवाना  ध्वनीक्षेपकाचा वापर करणे, रॅली, मिरवणुक तसेच सभा घेणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते असल्याने अप्रत्यक्ष विना परवानगी एकत्र जमुन व गर्दी हाईल असे कार्यक्रमाचे आयेजन करू नये तयेच कोणत्याही धर्माच्या, जातीच्या अथवा व्यक्तीच्या भावना दुखवतील असे कोणतेही कृत्य करू नये.ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे नोटीस मध्ये नमूद केले आहे. कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाणे २, कोळसेवाडी पोलिस ठाणे ३, खडकपाडा पोलिस ठाणे ८, डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाणे ४, टिळकनगर पोलीस ठाणे ४, मानपाडा पोलीस ठाणे ५ आणि विष्णूनगर पोलीस ठाणे ३ असे एकूण २९ मनसैनिकांना ताब्यात घेतले आहेत.

याबाबत मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत यांना विचारले असता ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करा आणि अनधिकृत मशिदीवरील भोंगे पोलिसांनी उतरवावे हेच तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.यात पोलीस मनसैनिकांची धरपकड करत असतील आता कायद्याचे राज्य राहिले नाही असेच म्हणावे लागेल. हे सरकार मन्सैनिकांचे खच्चीकरण करण्याचा जो प्रयत्न करत आहे, तो प्रयत्न असल होणार नाही. सरकारने त्याचे काम केले नाही तर मनसे हनुमान चालीसा पठन करणारच.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!