मुंबई

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना अखेर ‘ईडी’ कडून अटक..

मुंबई (प्रतिनिधी: अवधुत सावंत) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, भाजप यांच्यावर सातत्याने तोंडसुख घेण्यात मग्न असणारे आणि महाविकास आघाडीचे स्वयंघोषित प्रवक्ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांचा तकलादू शूरपणा त्यांच्याच अंगलट आला आहे. इतके दिवस ‘ईडी’ कार्यालयाकडून हजर राहण्यासाठी वारंवार नोटीसा येऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा शहाणपणा शेवटी त्यांच्याच अंगलट आला आहे.
 

गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर ईडी कडून काल अटक करण्यात आली आहे. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली केली आहे. वारंवार नोटीस पाठवूनसुद्धा संजय राऊतांनी ईडीच्या कार्यालयात जाणे टाळले असल्याने शेवटी रविवारी सकाळी ईडीची धाड राऊतच्या घरावर पडलीच. गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकासात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणात संजय राऊत यांचे व्यावसायिक भागीदार प्रवीण राऊत यांचे नाव आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी करून अखेर ईडीकडून संजय राऊतांना अटक करण्यात आली आहे.

संजय राऊतांवर ईडीकडून अटकेची होणारी कारवाई राजकीय सूडबुद्धीनेच होत आहे असा आरोप शिवसेना खा.अरविंद सावंत यांनी केला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

महाराष्ट्र

पंचायत राज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे प्रयत्न; ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!