महाराष्ट्र

शासकीय कामकाजात काळानुरूप बदल आवश्यक; अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रशासकीय कामकाजास गती द्यावी – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक – आधुनिक तंत्रज्ञानाने आज सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहेत. या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने शासकीय कामास गती देवून त्यात काळानुरूप बदल अंगीकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

महसूल दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महसूल दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना, विकास मीना, रोजगार हमी योजनेचे उपायुक्त अरूण आनंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, गणेश मिसाळ, निलेश श्रींगी, ज्योति कावरे, स्वाती थविल यांच्यासह सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहायक उपस्थित होते.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, महसूल विभागात काम करतांना इतर विभागांशी देखील सातत्याने संपर्क येत असतो. त्यामुळे सर्व विभागांना सोबत घेवून काम केल्यास लोकाभिमुख कामांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. यातूनच जिल्ह्याचा विकास साधता येतो. केलेल्या कामांचे स्वपरीक्षण करून त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येकाने सक्रियपणे काम करणे महत्वाचे आहे. आजच्या डिजिटल काळात आधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य आत्मसात केल्यास परिणामी निश्चितच कामात सुलभता येवून वेळेची बचत होण्यास मदत होणार असल्याने कामकाजात ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यावर अधिकाधिक भर देण्यात यावा.

देवमामलेदारांचा आदर्श ठेवून महसूल विभाग काम करीत असून आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम आपण सर्वांनी मिळून सांघिकरित्या केले पाहिजे. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून महसूल दिनाच्या शुभेच्छा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले की, महसूल विभाग हा इतर सर्व विभागांशी समन्वय ठेवून अविरतपणे काम करत आहे. त्यामुळे शासनाचा महसूल विभागावरील विश्वास कायम ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याने त्यासाठी कामात सातत्याने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. सोबत काम करणारे सहकारी व कर्मचारी आपले काम चोखपणे पार पाडत आहे याचा मला अभिमान आहे. आपण ज्या विश्वासाने काम करीत आहात तो विश्वास प्रशासकीय कामकाजात खुप महत्वाचा आहे. हाच विश्वास पुढे ठेवून आपण सर्वांनी आपले कर्तव्य पार पाडल्यास जिल्ह्याची प्रगती निश्चितच साधता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. महसूल दिनाचा इतिहास व त्याची सुरूवात कशी झाली याबाबत मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी म्हणून यांचा झाला सन्मान

रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, निफाड उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना पठारे, सिन्नर तहसीलदार राहुल कोताडे, तहसीलदार रचना पवार, येवला नायब तहसीलदार पंकज मगर, मालेगाव तहसिल कार्यालय अव्वल कारकून एस. ए. अहिरे, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेचे अव्वल कारकून सरिता चव्हाण, बागलाण तहसिल कार्यालयाचे मंडळ अधिकारी के.पी. गायकवाड, निफाड तहसिल कार्यालयाचे तलाठी पी.पी. देशमुख, देवळा तहसिल कार्यालयाचे तलाठी यु.आर.गोपनारायण, नाशिक तहसिल कार्यालयाचे महसूल सहायक अमर म्हात्रे, कळवण तहसिल कार्यालयाचे महसूल सहायक कविता मामीलवाड, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना शाखेचे महसूल सहायक विनोद बागुल, इगतपुरी तहसिल कार्यालयाचे शिपाई नंदू वारे, दिंडोरी तहसिल कार्यालयाचे कोतवाल पंडित राऊत, सिन्नर तहसिल कार्यालयाचे पोलीस पाटील रविंद्र सोनवणे, दिंडोरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे वाहनचालक एम. एस. सूर्यवंशी यांचा महसूल दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

महाराष्ट्र

पंचायत राज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे प्रयत्न; ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!