ठाणे

ठाण्यातील सतिष प्रधान ज्ञान साधना कॉलेज येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

ठाणे दि.05 : ठाण्यातील सतिष प्रधान ज्ञान साधना कॉलेज येथे राज्य शासनाच्या आपत्ती
व्यवस्थापन विभाग व ठाणे जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती प्रतिसाद यंत्रणे संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे उपसचिव श्रीरंग घोलप, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, राज्य प्रकल्प अधिकारी श्रीदत्त कामत, तहसिलदार राजाराम तवटे,आपत्ती प्रतिसाद विषयक विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आपत्तीशी व्यवस्थापनाशी संबधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी आधुनिक प्रशिक्षण घेऊन सतर्क राहणे गरजे आहे.त्यामुळे आपत्ती घडलेल्या ठिकाणी आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना तात्काळ मदत मिळून जिवित हानी रोखता येईल,असे श्री. घोलप यांनी यावेळी सांगितले.
आपत्ती काळात यंत्रणांनी कसा प्रतिसाद होतो,कोणती कार्यवाही तातडीने करावी यासंदर्भात या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात.तसेच समन्वय साधणे सोपे होईल.गरजूना तात्काळ मदत मिळेल.यंत्रणांनी समन्वयाने आपत्तीस सामोरे गेल्यास त्याची तीव्रता कमी करता येईल,असेही त्यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

महाराष्ट्र

पंचायत राज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे प्रयत्न; ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!