ठाणे

महा आवास अभियान अंतर्गत उत्कृष्ठ घरकुल चा प्रथम पुरस्कार दहागाव ला तर सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा मान काकडपाडा ग्रामपंचायतीला!आ किसन कथोरे यांच्या हस्ते सत्कार !

कल्याण (संजय कांबळे) : महा आवास अभियान अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत घरकुल योजना तालुका स्तरावरील पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये उत्कृष्ठ घरकुल  सन २०१९/२० चा प्रथम पुरस्कार दहागाव मधील लहू बाबू वाघे यांना तर सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा मान काकडपाडा ग्रामपंचायतीला मिळाला. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी व्यासपीठावर  कल्याण पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोईर, झेडपी सदस्या रेश्मा मगर, सदस्यां रंजना देशमुख, अस्मिता जाधव, भारती टेंबे, दर्शना जाधव, पांडुरंग म्हात्रे, यशवंत दळवी,गटविकास अधिकारी अशोक भवारी, प्रशिक्षणार्थी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती राणे मँडम, मानिवली गावचे उपसरपंच चंद्रकांत गायकर ,भाजपाचे देवीदास चौधरी, गोवेली च्या सरपंच पूजा जाधव, जांभूळ चे परिक्षित पिसाळ, म्हसकळचे मुकणे आदी मंडळी उपस्थित होते.

प्रथम  आमदार किसन कथोरे यांच्या हस्तेदिप प्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी प्रास्ताविक केले.तदनंतर महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ठ काम करणाऱ्या लाभार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, सर्वोत्कृष्ट क्लस्टर, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत आणि सर्वोत्कृष्ट घरकुल अशी विभागणी करण्यात आली होती.

यामध्ये पंतप्रधान आवास योजना, सन २०१९/२०या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट घरकुलामध्ये लहू बाबू वाघे याला प्रथम क्रमांक, नारायण रामू मुकणे(म्हसकळ)व्दितीय, आणि सुरेश सुक-या बगळे(म्हसकळ)तृतीय क्रमांक पटकावला तर राज्य पुरस्कृत आवास योजनेत  सर्वोत्कृष्ट क्लस्टर प्रथम क्रमांक खडवली, व्दितीय घोटस ई,आणि तिसरा नंबर मांजर्ली यांना दिला. तसेच सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायत काकडपाडा, प्रथम, राया ओझर्ली व्दितीय, आणि जांभूळ तृतीय यांना बहुमान मिळाला. आदिम जमाती मध्ये प्रथम क्रमांक काकडपाडा येथील बंधू गणू मुकणे,रमाई आवास भिमा कमळू पवार, व्दितीय, आणि तृतीय क्रमांक पुजा राम वाघे,राया यांचा समावेश होता,

या सर्वांना आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात आ कथोरे म्हणाले, तालुक्यातील कोणताहि लाभार्थी घरकुलापासून वंचित राहता कामा नये,पाटलांच्या म्हशीला घर आणि आदीवासी बेघर हे चालणार नाही, जागची काही अडचण आली तर मी सोडवतो,तूम्ही प्रस्ताव पाठवा असे सांगून गोरगरीब, आदिवासी, कातकरी यांना घरकुल देण्यासारखे दुसरे पुण्य नाही असे बोलून पाणी पुरवठा, रस्ते, आदी बाबतीत तालुक्याला सुमारे१२५कोटी रुपये निधी दिल्याचे सांगून लवकरच कल्याण पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा प्रश्न मार्गी लावू असेही ते म्हणाले, यावेळी सदस्य यशवंत दळवी, उपसरपंच चंद्रकांत गायकर यांनी काही मुद्दे मांडले,

याप्रसंगी या आवास योजनेत चांगले काम केल्याबद्दल विस्तार अधिकारी श्री हरड,ग्रामसेवक गजानन कुटेमाटे, आँफरेटर स्वाती, शाखा अभिंयता आदींचा आमदार कथोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामसेवक नितीन चव्हाण यांनी केले तर नियोजन कृषी अधिकारी एस एस संत यांनी पाहिले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

महाराष्ट्र

पंचायत राज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे प्रयत्न; ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!