ठाणे

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून अंबरनाथमध्ये प्रभात फेरीचे आयोजन

“हर घर तिरंगा, घर घर तिरंगा” ची जगजागृती

अंबरनाथ दि. ०८ (नवाज वणू) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, प्राचार्य अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पोलीस स्टेशन व औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सुमारे ८०० पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी आणि ४० पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

“हर घर तिरंगा, घर घर तिरंगा” ची जगजागृती व्हावी व ध्वजाचे सन्मान राखला जावा या उद्देशाने या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ येथे प्रवेशाकरिता येणाऱ्या विद्यार्थी व पालकांना हि “हर घर तिरंगा, घर घर तिरंगा” ची जगजागृती करण्यात येत असल्याचे प्राचार्य अजित शिंदे यांनी सांगितले. 

          याप्रसंगी अंबरनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (प्रशासन) पंकज जाधव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथचे प्राचार्य अजित शिंदे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा घनवट, पोलीस उपनिरीक्षक दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक सय्यद, गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार मधुकर म्हसे, पोलीस नाईक दत्तात्रेय विशे, पोलीस नाईक प्रशांत गोसावी, पोलीस नाईक रामचंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पादीर, समन्वयक नवीन भोपी यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

महाराष्ट्र

पंचायत राज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे प्रयत्न; ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!