नवी मुंबई

विभागीय अप्पर आयुक्त किशन जावळे यांच्या हस्ते कोकण भवन येथे ध्वजारोहण संपन्न

नवी मुंबई, दि.15 :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन आज कोकण भवन येथे जल्लोषात साजरा झाला. यावेळी कोकण विभागीय अप्पर आयुक्त श्री.किशन जावळे यांच्या हस्ते कोकण भवन प्रांगणात सकाळी 09.05 वाजता ध्वजारोहण झाले.
या समारंभास नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री.अभिजित बांगर, नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री.बिपीनकुमार सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.


केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 9 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कोकण भवन येथे “घरोघरी तिरंगा” या अत्यंत महत्त्वाकांशी उपक्रमांतर्गत आज संपूर्ण कोकण भवन इमारत सजवण्यात आली होती. इमारतीच्या आवारात नवनवीन संकल्पनेतून आकर्षक असे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा संदेश देणारे रांगोळी, सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. कोकण भवन येथील माजी सैनिक संघटना यांच्यावतीने अमर जवान प्रतिकृती स्तंभ ठेवण्यात आले होते. विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन यांच्यावतीने मुख्य प्रवेशद्वारात उभारण्यात आलेला “आजादी का अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा” घोषवाक्य असलेला सेल्फी पॉईंट सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.


यावेळी नवी मुंबई पोलीस पथक यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमास उपायुक्त (महसूल) श्री.मकरंद देशमुख, उपायुक्त (सामान्य) श्री.मनोज रानडे, उपायुक्त (पुरवठा) श्री.रवि पाटील, उपायुक्त (रोहयो) श्रीम.वैशाली राज चव्हाण (निर्धार), उपायुक्त (करमणूक) श्रीम.सोनाली मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते. अप्पर आयुक्त किशन जावळे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच घरोघरी तिरंगा हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहनही केले.

यावेळी अप्पर आयुक्त किशन जावळे, नवी पोलीस आयुक्त श्री.बिपीनकुमार सिंह आदि मान्यवर तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विभागीय माहिती कार्यालयामार्फत लावण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटमधून आपले छायाचित्र काढले. यावेळी शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निंबाजी गीते यांनी केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!