ठाणे

दिव्यातील पाणी वितरण व्यवस्थेत घोळ,टॅंकर माफियांना अभय, दिवा प्रभाग समितीचे उपअभियंता वाघिरे यांची चौकशी करा! – रोहिदास मुंडे

दिवा:-दिव्यातील पाणी समस्येला उपअभियंता सुरेश वाघिरे हे जबाबदार असून त्यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभारामुळे दिव्यात अनेक ठिकाणी अनधिकृत पाईपलाईन जोडणी देण्यात आली आहे.वाघिरे हे टॅंकर माफियांना पाठीशी घालत आहेत असा गंभीर आरोप भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला असून वाघिरे यांच्या चौकशीची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

दिवा शहरात नव्याने पालिकेने मंजूर केलेला पाईपलाईन अद्याप टाकण्यात आलेल्या नाहीत,त्या टाकण्यास वाघिरे चालढकल करत आहेत असा आरोप करत भाजपचे रोहिदास मुंडे यांनी वाघिरे यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी पालिका अतिरिक्त नगर अभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे केली आहे

दिवा शहरात भारतीय जनता पार्टी मार्फत पाण्यासाठी आंदोलन करण्यात आल्यानंतर प्रशासनामार्फत अनेक नवीन पाईपलाईन मंजूर झाल्या. त्या पाण्याच्या पाईपलाईनचे पाईप शहरातील विविध भागात टाकण्यात आले आहेत. मात्र पाणी खात्याचे अभियंता श्री. वाघिरे हे दिव्यातील पाणी समस्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून काम सुरू करत नाहीत असे मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे.आजही अनेक भागात पाणीटंचाई आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या चोरीची लाईन देखील देण्यात आलेले आहेत. मनमानी पद्धतीने पाणी कनेक्शन देण्यात श्री. वाघरे यांचा सहभाग आहे. त्यामुळे अभियंता वाघिरे यांच्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!