ठाणे

अडीच महिन्यात बीएसयुपी प्रकल्पातील ३५० लाभार्थ्यांना मोफत घरे मिळणार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

डोंबिवली ( शंकर जाधव ) : गरीब आणि विविध विकास कामात झालेल्या नागरिकांच्या पूर्णवसनासाठी शहरी गरिबांसाठी अर्थात बीएसयूपी प्रकल्प शासनाकडून सुरू करण्यात आला.२००७ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पात अद्याप अनेक लाभार्थी कागदपत्राची पूर्तता करूनही घरांपासून वंचीत राहिले.मात्र शिंदे- फडणवीस सरकारने या लाभार्थ्यांना मोफत घरे देण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांनी सरकारचे आभार मानले.याबाबत माहिती देण्यासाठी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली  होती. 

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे म्हणाले, बीएसयूपी प्रकल्पातील घरांसाठी केंद्र, राज्य सरकार व पालिका प्रशासनाने निधीतुन कामे सुरू झाली. मध्यतरी हा प्रकल्प रखडल्याने लाभार्थी चिंतेत होते.लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर घरे मिळण्यासाठी लाभार्थ्यांना काही १७ लाख रुपये देणे बंधनकारक होते.मात्र शासन दरबारी पाठपुरावा करून 3 लाख रुपये लाभार्थ्यांनी देऊ नये असा निर्णय झाला होता. परंतु लाभार्थ्यांनी 14 लाख देणे आवश्यक असल्याने लाभार्थीची डोकेदुखी वाढली होती.यावर शिंदे- फडणवीस सरकारने लाभार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेत दिलासा दिला आहे.उर्वरित 14 लाख रुपये लाभार्थ्यांना माफ करण्यात आले असून मोफत घरे मिळणार आहे.४ हजार घरे बनविण्यात येणार असून यातील 350 घरे येत्या अडीच महिन्यात देण्यात येणार आहे.

  रस्त्याबाबत बोलताना खासदार डॉ. शिंदे म्हणाले, माझ्या शहराची जबाबदारी माझी असून आतापर्यत ४०० ते ५०० कोटी रुपये मुख्यमंत्री  शिंदे हे सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम ) मंत्री असताना मंजूर करण्यात आले होते.यातील 360 कोटी रुपये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील रस्ते,  एमआयडीसीतील रस्त्यांच्या समावेश आहे.डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यारीत येत असून तोही रस्ता मंजूर करण्यात आला आहे.येत्या 7 ते 8 महिन्यात चांगले रस्ते बनविल्याचे नागरिक पाहतील असा विश्वास खासदार डॉ.शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या विकास कामांचे भूमिपूजन केले जाणार असल्याचेही त्यांनी संगीतले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!