क्रिडा

चंद्रपूर येथील राष्ट्रीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुश्मिता देशमुखला रौप्य पदक

भद्रावती, ( प्रतिनिधी ) : चंद्रपूर येथे सीनिअर राष्ट्रिय स्तरिय क्लासिक पॉवरलिफ्टींग स्पर्धा संपन्न झाली  या या स्पर्धेत देशाच्या विविध राज्यातून 52 किलो वजनी गटामध्ये 23 खेळाडूंचा सहभाग होता. सुश्मिता सुनिल देशमुख हिने 52 किलो वजनी गटात पण स्वतःच वजन 47.600 असून ही रौप्य पदक पटकावले , बेंच प्रेस या प्रकारात रौप्य पदक, डेटलिस्ट या प्रकारात सुद्धा रोप्य पदक, आणि पूर्ण पॉवरलिफ्टिंगमध्ये  रौप्य पदक त्याचप्रमाण दुसरी सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू 2022-23 हा किताब पटकावला.

या स्पर्धेच्या यशाचे श्रेय ती तिचे प्रशिक्षक विनायक जयराम कारभारी (कारभारी जिमम्नसियमव क्रिडा मंडळ, कल्याण) यांना देते. तसेच निलेश नामदेव भोइर, आई वडील- सुनिल. आ देशमुख, वंदना सुनिल देशमुख यांना देते.  या स्पर्धेच्या यशाचे श्रेय ती तिचे प्रशिक्षक विनायक जयराम कारभारी (कारभारी जिमम्नसियमव क्रिडा मंडळ, कल्याण) यांना देते. तसेच निलेश नामदेव भोइर, आई वडील- सुनिल. आ देशमुख, वंदना सुनिल देशमुख यांना देते.

सुश्मिता देशमुख ही पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राष्ट्रीय व जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करीत आहेत. मात्र सदर स्पर्धांना नॉमिनेशन मिळाल्यावर तेथे पोहोचण्यासाठी लागणारा खर्च तिच्या कुटुंबियांना पेलवत नाही. ठाण्यातील विटाव्यात राहत असलेल्या अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या या खेळाडूला आर्थिक पाठबळ मिळाले तर जगाच्या नकाशावर भारताचे नाव कोरून यश संपादन करू शकते. म्हणूनच तिला सहकार्य करण्याचे आवाहन तिचे पालक करीत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!