गुन्हे वृत्त

मानपाडा पोलिसांनी 75 तासात सुरतहून अल्पवयीन मुलाची केली सुखरूप सुटका ..

डोंबिवली  ( शंकर जाधव ) : डोंबिवलीतील व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून अपहरणकर्त्याने दीड कोटीची खंडणी मागतील होती.मात्र मानपाडा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करत 75 तासात सुरतहून या मुलाची सुखरूप सुटका करत करून  आरोपींना बेड्या ठोकल्या.ठाणे, ठाणे ग्रामीण, पालघर, जव्हार , मोखाडा  नाशिक आणि वलसाड आणि सुरत  मधील  12 अधिकारी, 150 कर्मचारी आणि 400  गावकऱ्यांची  पोलिसांनी मदत घेतली होती.     फरहदशहा फिरोजशहा रफाई (26, रा. राजकोट – गुजरात) , प्रिन्स कुमार राम नगिना सिंग(24 , भावनगर गुजरात) , शाहीन शाबम मेहतर (27), फरहिन प्रिसकुमार सिंग (20), नाझिया फरहद रफाई ( 25 )  अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

 डोंबिवली मधील व्यावसायिक  रणजित झा यांचा  12 वर्षीय मुलगा रुद्रा हा क्लास वरून परत येत असताना  आरोपींनी त्याचे अपहरण केले होते. मुलगा घरी परत न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. आरोपींनी झा यांच्याकडे  मुलाच्या सुटकेसाठी  दीड कोटीची खंडणी मागितली. झा यांनी यामुळे मानपाडा  पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची ८ पथके तैनात करण्यात आली होती. मानपाडा पोलिसांनी 500 सीसीटिव्ही कॅमेरेच्या मदतीने आरोपीचा माग काढत पाठलाग केला.आरोपी  तीन वेळा रुद्राच्या पालकांना फोन करून  दिड कोटीची मागणी केली. गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा माग काढताना पोलीस  त्या त्या भागात काम केलेल्या महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होंनमाने, मधुकर कड यांची पोलीस अधिकाऱ्याची मदत घेत आरोपीचा पाठलाग केला. मात्र रुद्राला घेऊन आरोपी  सुरतला गेले. पोलिसांनी आरोपींच्या सुरत पर्यंत पाठलाग करत हे आरोपी ज्या घरात राहत होते त्या घराला  वेढा घातला.आरोपीच्या ताब्यात असलेल्या रुद्राची सुटका करून  आरोपींना बेड्या ठोकल्या.  75 तासाच्या अथक प्रयत्नानंतर मुलाची पोलिसांनी यशस्वी सुटका केल्याने पोलिसांनी आनंदाचे व्यक्त केला. वातावरण पसरले तर मुलाच्या वडिलांनी पोलिसांना धन्यवाद दिले.


    7 मे ला डोंबिवलीतील व्यावसायिक रणजित झा यांचे पार्किंग वादातून अपहरण केले होते. मुंब्रा पोलिसांनी दिवा शहरात झा यांची सुटका केली.आता आपल्या मुलाचीही सुटका मानपाडा  पोलिसांनी केल्याने पोलिसांचे उपकार कधीही विसणार नाही असे झा यांनी सांगितले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!