क्रिडा

22 वी नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा संघ अव्वल

डोंबिवली ( शंकर जाधव ) : 22 वी नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग चॅम्पियनशिप 2022- 23 ही स्पर्धा दिनांक 11 ते 13  नोव्हेंबर या कालावधीमध्ये डॉ.झाकीर हुसेन अँकवेटिक कॉम्प्लेक्स ,गुहाटी आसाम येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये ते एकूण 25 राज्यांनी सहभाग घेतला होता. तसेच भारतातून एकूण साडे चारशे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये  महाराष्ट्र पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आपल्या राज्याच्या 55 मुलांनी सहभाग घेऊन या स्पर्धेमध्ये  खेळाडूंनी यश मिळवले. या पूर्ण स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा संघ 428 गुण मिळवून या राष्ट्रीय स्पर्धेत चॅम्पियनशिप ट्रॉफी प्राप्त केली आहे.

महाराष्ट्राचा ऑलिम्पिक खेळाडू सुयश जाधव तसेच स्वप्निल पाटील, दीपक पाटील, आफ्रिदी, अभिषेक ,यांच्या उत्कृष्ट खेळाने मुलींमध्ये कांचन चौधरी, वैष्णवी जगताप ,शश्रुती नाकाडे, सिद्धी दळवी, रोशनी पात्रा, तृप्ती व नाशिकच्या सिद्धी व गौरी यांनी सुवर्णपदकाची परंपरा कायम ठेवली.पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया च्या वतीने यावर्षीच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त स्वप्निल पाटील यांचा सत्कार करण्यात आला व रिया सचिन पाटील हिला उत्कृष्ट खेळाडूची ट्रॉफी देण्यात आली.      मिडले रिले, फ्रीस्टाइल रिले या दोन्ही स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या मुला मुलींनी सुवर्ण व रोप्य पदक प्राप्त केले या दोन्ही स्पर्धा खूप अटितटीच्या झाल्या या स्पर्धेमध्ये पूर्ण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ‘ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने’ दणाणले.

महाराष्ट्र पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर नाले व चेअरमन श्री. राजाराम घाग , (इंग्लिश चैनल स्विमर, शिव छत्रपती पुरस्कृत) तसेच टीम मॅनेजर अर्चना जोशी व  तिवारी यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्राच्या गुणी खेळाडूच्या प्रयत्नांनी या महाराष्ट्र स्पोर्ट्स असोसिएशनने पुन्हा एकदा उत्तुंग यश प्राप्त केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!