गुन्हे वृत्त

कौटुंबिक वादातून बापाच्या डोक्यात लाकडी फळीचा फटका मारून त्यांना जागीच ठार मारणाऱ्या मुलाला पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

अंबरनाथ ( प्रतिनिधी: अवधुत सावंत ) बापाच्या डोक्यात लाकडी फळीचा फटका मारून ३१ वर्षीय मुलाने जन्मदात्या ६० वर्षीय बापालाच जागीच ठार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक हिंसाचाराची ही घटना अंबरनाथ पूर्वेतील एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे. 

प्रकाश देविदास सूर्यवंशी असे अटक आरोपी मुलाचे नाव आहे. तर देविदास किसन सूर्यवंशी असे हत्या झालेल्या बापाचे नाव आहे.


रक्तस्त्राव झाल्याने जागीच ठार
 

मृत देविदास हे पत्नी आणि आरोपी मुलगा प्रकाश यांच्यासह अंबरनाथ पूर्वेकडील दत्त कुटीर चाळीत राहत होते. गेल्या काही दिवसापासून बाप लेकात घरगुती कारणावरून कौटुंबिक वाद होत होते. बाप लेकाचा पुन्हा याच वादातून १३ नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान घरातच वाद झाला. हा वाद यावेळी विकोपाला जात मुलाने घरात असलेल्या लाकडी जाड फळी उचून बापाच्या डोक्यात जोरदार फटका मारला. या जाड फळीच्या  हल्ल्यात बाप जागीच जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडून त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

आरोपी मुलगा पोलीस कोठडीत

  दरम्यान, घटनेची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्यात समजताच पोलीसांचे एक पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत देविदास यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून हल्लेखोर मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर मृतकाच्या पत्नीने मुलाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीसांनी आरोपी मुलावर भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपी मुलाला दुपारच्या  न्यायालयात हजर केले असता त्याला अधिक तपासाकरिता पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे हे करीत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!