गुन्हे वृत्त

️घरफोडी करणा-या सराईत आरोपीस अटक ; ९ गुन्हे उघडकीस, 4 लाख 88 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

ठाणे. ता 23 नोव्हे (संतोष पडवळ) : विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हयांचे वाढते प्रमाण लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सदर गुन्हयांचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि अंमलदार यांनी सुरु करुन प्रत्येक गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरुन तांत्रीक पुरावे व माहिती हस्तगत करून आरोपीताचे वास्तव्याची माहिती काढून नालासोपारा पूर्व मधून आरोपी नामे प्रथमेश शिवराम पवार, वय २४ वर्षे, रा. रुम नं-४, जेसीका चाळ, ओमनगर, मोरेगांव, नालासोपारा पूर्व ता वसई जि-पालघर यास दिनांक २१/११/२०२२ रोजी ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या तपासामध्ये त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून अटकेदरम्यान १) १,३२,९६२/- रु. कि. चे ३७.५० ग्रॅम वजनाची, २) १,५४,०००/- रु. कि.ची ३९.९६० ग्रॅम वजनाची व ३) ७९,५८०/- रु. कि.चे १९ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व १३ मोबाईल हॅन्डसेट असा एकुण ०४,८८,०४२/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ श्री. रामचंद्र देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस स्टेशनचे श्री. सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. दिलीप राख, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोउनि / संदेश राणे, पो. हवा./सचिन लोखंडे, संदीप जाधव, संदिप शेरमाळे, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, पोकों / रवी वानखेडे, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सचिन ओलेकर, सागर घुगरकर, दत्तात्रय जाधव यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा./सचिन लोखंडे हे करित आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!