क्रिडा ठाणे

बँकॉक मध्ये मधील क्वीन्स कपमध्ये कल्याण – डोंबिवलीतील 9 खेळाडूंचे सुयश

डोंबिवली ( शंकर जाधव  ) : १९ व २० नोव्हेंबर रोजी बँकॉक येथे झालेल्या क्वीन्स कप थायलंड जम्प्रोप चॅम्पियनशिपमध्ये भारताने 28 पदके जिंकली.28 पदकांपैकी 15 पदके कल्याण-डोंबिवली येथे राहणाऱ्या खेळाडूंनी जिंकली आणि अमन वर्मा यांनी प्रशिक्षित दिले. 

     स्पर्धेत  10 देशांमधील 800 हून अधिक खेळाडू  सहभागी झाले होते. या स्पर्धेत  भारतासाठी कल्याण – डोंबिवलीतील 9 खेळाडूंनी सर्वाधिक पदके जिंकून भारतासाठी इतिहास रचला.हा  संघाने जागतिक जंप रोप चॅम्पियनशिपसाठी तयारी केली आहे. जुलै 2023 मध्ये यूएसएमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेत 67 देशातील खेळाडू भाग घेणार आहेत.

भूमिका नेमाडे ( ३ रौप्य १ कांस्य ),भार्गवी पाटील ( २ रौप्य १ कांस्य ), तन्वी नेमाडे ( १ रौप्य २ कांस्य ) ,अंकिता महाजन ( १ रौप्य ),एशान पुथरण  (२ कांस्य ), श्रिया वाणी ( १ कांस्य ),पद्माक्षी मोकाशी ( १ कांस्य) मानस मुंगी आणि श्रीया बेलोसे अशी खेळाडूंची नावे आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!