ठाणे

प्रणितमुळे माय लेकराची भेट

डोंबिवली ( शंकर जाधव ) : चुकीच्या ट्रेन मध्ये चढल्यानंतर त्या कुटुंबियांनी सिग्नल लागताच उतरण्याचा निर्णय घेतला.मात्र यावेळी आपला ३ वर्षाचा मुलगा आधी उतरविण्यासाठी एका प्रवाश्याकडे दिले. लोकल सुरू झाली आणि आपले मूल प्रवाशी प्रणितकडे राहिले.घाबरलेल्या कुटुंबियांनी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात घडलेली घटना सांगण्यासाठी गेले.त्यावेळी प्रणित आपल्या मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात आल्याचे दिसले.आपल्या मुलाला जवळ करत आईने प्रणितचे आभार मानले.ही मंगळवारी  घटना दिवा ते कोपर रेल्वे स्थानकात दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल धनराज व पत्नी अंजू व मुलगा यज्ञेश हे मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दिवा येथून आपल्या गावी रोहा येथे जाण्यासाठी निघाले.हे कुटुंब  चुकून पनवेल ऐवजी वसईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढल्या.लोकल सुरू झाल्यावर आपण चुकीच्या ट्रेनमध्ये बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. या कुटुंबियांनी  कोपर स्थानकात उतरण्यासाठी त्या दरवाजात थांबल्या होत्या. मात्र ही मेमु ट्रेन दिवा ते अप्पर कोपर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान सिग्नल वर  थांबतच अंजू यांनी मुलासह खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला उतरता आले नाही याचवेळी गाडीतून उतरत असलेल्या सह प्रवासी प्रणित जंगम याला  मुलाला खाली उतरून दे अशी विनंती तिने  केली. प्रणित तीन वर्षाच्या यज्ञेश ला घेऊन खाली उतरला मात्र इतक्यात ट्रेन सुरू झाली.. यामुळे अंजू गाडीतून उतरू शकली नाही.  आपला मुलगा एका अज्ञात इसमासोबत एकटाच आहे तो हरवणार तर नाही ना या कल्पनेने अंजू कासावीस झाली.  त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने कुटुंबाला आणि  रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली.इतर प्रवाशांनी अंजूला अप्पर कोपर रेल्वे स्टेशनवर उतरवले. आणि धावतच  मुलाचा शोध घेण्यासाठी पुन्हा दिवा गाठले.मात्र तोपर्यंत प्रणित  मुलाला घेऊन रेल्वे रुळातून  तासभर चालत कोपर रेल्वे स्टेशनला पोचला. त्याने रेल्वे पोलिसांसह स्टेशन मास्तर कडे जात घडलेली घटना सांगितली. स्टेशन मास्तरांनी आजूबाजूच्या स्थानकात संपर्क करत ही माहिती दिली. काही वेळातच अंजू व तिचे कुटुंबीय कोपऱ रेल्वे स्टेशनला आले. आपल्या मुलाला पाहून अंजूचे डोळे पाणावले. तिने मुलाला मिठीत घेत तिच्यासाठी देवदूत ठरलेला प्रणित चे आभार मानले.प्रणित ने दाखवलेली सतर्कता व प्रसंगावधान यामुळेच ताटातूट झालेल्या माई लेकाची भेट झाली. 

प्रणित हा नालासोपारा येथे राहतो. एका कुरिअर कंपनी मध्ये तो नोकरी करतो ..दुपारी वसई ट्रेन ने कोपर येथे येणार होता..मात्र त्याला झोप लागल्याने तो दिवा येथे पोहचला .त्यानंतर पुन्हा त्याच ट्रेन ने कोपर येथे जाण्यासाठी निघाला याच दरम्यान ही घटना घडली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!