ठाणे

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सच्या वतीने क्सप्रेशन ऑफ ग्रँटीट्युड ( कृतज्ञता दिवस ) संपन्न

डोंबिवली ( शंकर जाधव ) : एक्सप्रेशन ऑफ ग्रँटीट्युड ( कृतज्ञता दिवस ) हा आगळा वेगळा उपक्रम रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स या संस्थेने कामा हॉल येथे आयोजित केला होता.

प्रत्येकाच्या आयुष्याचा आजवरच्या प्रवास अनेक चढ उतारानीं भरलेला असतो, अनेक कठीण प्रसंग आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वळणावर आलेले असतात. या प्रसंगात आधार देणारे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नक्की कोणी न कोणी असतेच. आजच्या आपल्या यशात सिहंचा वाटा असणाऱ्या या व्यक्तीचे तेव्हाच काय पण कधीही आभार मानणे त्याचा भावानांचा अपमान ठरवू शकते. त्यामुळे या निर्व्याज भावनांचा, त्या व्यक्तीचा आदरपूर्वक सन्मान करणे, तसेच या देण्याच्या भावनेचा आदर्श समाजसमोर ठेवणे या हेतूने हा सोहळा आयोजित केला होता.

या समारंभात रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सचे  सदस्य त्यांच्या आयुष्यातील अशा व्यक्तींना घेऊन सहभागी झाले होते. कार्यक्रमाची ( प्रोजेक्ट )  संकल्पना रो.विद्याधर कुलकर्णी यांची असून प्रोजेक्ट हेड रो.प्रशांत बापट, अध्यक्ष रो.निलेश सोनावणे यांसह अनेक रोटेरियन उपस्थित होते.या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 चे गव्हर्नर  कैलाश जेठानी उपस्थित होते.माझ्या ३५वर्षाच्या कारकिर्दीत  रोटरीने इतका छान कार्यक्रम घेतला नसल्याचे रो.जेठानी यांनी सांगितले. 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!