ठाणे मुंबई

दिव्यात रेशनिंग ऑफिस व रेशनिंग दुकानाची संख्या वाढविण्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आदेश

भाजपचे शिवाजी आव्हाड यांच्या प्रत्यक्ष भेट व मागणी नंतर संबंधित अधिकाऱ्यांना रविंद्र चव्हाण यांनी दिल्या फोनवरून सूचना

मुंबई:-दिवा शहराची लोकसंख्या पाच लाखाच्या घरात गेली आहे.येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दिव्यात नवीन रेशनिंग ऑफिस व नवी रेशनिंग दुकानांना परवानगी मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व अन्न नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन केली.यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ठाणे जिल्ह्यातील दिवा शहराची लोकसंख्या मागील काही वर्षात वेगाने वाढत आहे.वाढत्या लोकसंख्येच्या तुलनते येथे प्रशासकीय व्यवस्था अस्तित्वात नाही. रेशनिंग सुविधांच्या बाबत येथील नागरिकांना डोंबिवली व मुंब्रा या शहरांवर अवलंबून राहावे लागते. दिवा शहरात रेशनिंग ऑफिस नसल्याने व रेशनिंग दुकानांचे जाळे मजबूत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असते.

नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी या गंभीर विषयावर मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन दिवा शहरात रेशनिंग ऑफिस व वाढीव रेशनिंग दुकाने यांना मंजुरी द्यावी अशी मागणी केली. या मागणीची तातडीने दखल घेत मंत्री चव्हाण यांनी संबंधित अधिकारी यांना याबाबत आदेश दिले असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!