क्रिडा ठाणे

️ठाणे जिल्हा परिषदेच्या अंबरनाथ येथील शाळेत केंद्रीय क्रीडा स्पर्धा उत्साहात सपन्न

ठाणे,अंबरनाथ. ता 12 डिसें (संतोष पडवळ) : कोरोनामुळे दोन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद ठाणे तालुका अंबरनाथ मधील मंगरूळ केंद्राच्या सन 2022 च्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.

विद्यार्थी व शिक्षक अतिशय आनंदाने आणि उत्साहाने क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले होते. जिल्हा परिषद शाळा शिरवली च्या पहिली ते चौथीच्या लहान गट लंगडी मुले प्रथम क्रमांक व लहान गट मुली पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावित यशाची हॅट्रिक साजरी केली त्यात भरीस भर गट लहान मुली रिले प्रकारातही प्रथम क्रमांक पटकावून सर्वांची मने जिंकली या छोट्या छोट्या चिमुरड्यांमध्ये वैयक्तिक खेळात 50 मीटर धावणे गटात गौरी प्रकाश वाघ हिने द्वितीय क्रमांक पटकावत शाळेसाठी आणखी एक ट्रॉफी मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. परंतु संपूर्ण सामन्याचे आणि स्पर्धेचे लक्ष वेधून घेतले ते इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्पिता पिंटू वाघ हिचा एनर्जी आणि तिचा उत्साह पाहून सर्वजण थक्क झाले लहान गटातील जवळजवळ सर्व स्पर्धात अधिराज्य गाजवून जि प शाळा शिरवलीने विजयाची घोडदौड कायम ठेवली.

विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांची शिरवली गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. प्रसंगी मुख्याध्यापक केशव कुटे सर व सहशिक्षक विजय इंगळे यांनी खूप मेहनत घेतली.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!