ठाणे दि.20 : जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असून या पुरस्कारांतर्गत सन 2021-22 या वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक असे एकूण चार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.त्यासाठी दि.05 जानेवारी 2023 पुर्वी अर्ज करावेत,अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील उत्कृष्ठ खेळाडू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणांतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार योजन कार्यान्वित आहे. जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ठाणे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांनी विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, कोर्टनाका, ठाणे (प) येथून प्राप्त करुन घ्यावी.
जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी दि.05 जानेवारी 2023 पुर्वी आवश्यक कागदपत्रासह बंद लिफाफ्यात कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत. अधिक माहिती साठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे (दूरध्वनी क्रमांक- ०२२ २५३६८७५५) येथे संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी केले आहे.