गुन्हे वृत्त ठाणे

रिक्षाचालकाकडे पैशांची मागणी ; वाहतूक पोलिस निलंबित

कल्याण  : सोशल मिडीयाचा वापर चांगल्या व वाईट कामासाठी देखील होते. एका वाहतूक पोलिसाला मात्र सोशल मिडियाचा चांगलाच फटका बसला आहे. पोलिस वर्दीचा गैरवापर करत रिक्षाचालकाकडून पैसे मागतानाचे वाहतूक पोलिसाचे मोबाईलवर केलेले चित्रीकरण व्हायरल झाले आहे. याची दखल घेत कोळसेवाडी वाहतूक पोलिसांनी निरिक्षक नवनाथ मिरवणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याचा पुढील तपास सुरु आहे. वाहतूक पोलिस कारवाईच्या नावाखाली चिरीमिरी घेत असल्याचा प्रकार नविन नाही. कल्याण कोळसेवाडी येथील वाहतूक पोलिस चौकीचे निरिक्षक नवनाथ मिरवणे हे चालकाकडून पैसे घेत असल्याने एका रिक्षा चालकाने या घटनेचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले.

कल्याण पूर्वेत चक्की नाका परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने मिरवणे यांनी एका रिक्षा चालकाला अडविले. त्याच्याकडून कायदेशीर रित्या पावती देत दंड वसूल करण्याऐवजी त्याच्याकडे पैशाची मागणी करत होते. रिक्षाचालक हा 100 रुपये देत असल्याने त्यांनी प्रथम 500 रुपयांची मागणी केली. ऐवढे पैसे रिक्षाचालकाने नाहीत म्हटल्यावर आणखी शंभर रुपये दे असे त्यांनी सांगितले. रिक्षाचालकाने 200 रुपये दिल्यानंतर त्याला जाऊ देण्यात आले. ही सर्व घटना मोबाईल मध्ये चित्रित करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाला आहे. याची माहिती समजताच पोलिसांनी या घटनेची दखल घेत तपास सुरु केला. कल्याण कोळसेवाडी येथील वाहतूक पोलिस चौकीत कार्यरत असणारे मिरवणे यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे कल्याण कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले. याचा अधिक तपास केला जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!