मुंबई, (संतोष पडवळ ) : आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारलाय. विशेष म्हणजे त्यांनी आज एक ट्विटही केलंय, त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबई पोलीस एक टीम आहे. सिंघम अस्तित्वात नाहीत, अशा आशयाचं ट्विट देवेन भारती यांनी केलंय.
खरं तर आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची बुधवारी गृह विभागाने मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केलीय. हे खास पद नव्यानेच तयार करण्यात आले आहे. हे पद अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखालील पोलीस सह आयुक्तांच्या कामाचे अधिक प्रभावीपणे पर्यवेक्षण करता यावे म्हणून हे पद तयार केल्याचे गृह विभागाने शासन आदेशात स्पष्ट केले आहे.