ठाणे : राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोलबाड नाक्यावर व्यापाराला ठार मारण्याच्या उद्धेशाने फायरिंग करून त्याला जखमी करून दोन जण बाईक वरून पळून गेले होते. या गोळीबारत व्यापारी चेतन ठक्कर यांच्या पोटात गोळी लागली होती. त्यात व्यापाऱ्याची प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत त्याला वाचवल. पळालेल्या आरोपिंचा पोलिस शोध घेत होते. त्या नंतर 5 जानेवारी 2023 मध्ये राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीचा गुन्हा घडला.
या घरफोडीच्या गुन्ह्या बाबत पोलीस उपायुक्त गणेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सोनली ढोले यांनी राबोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांना त्या प्रमाणे सूचना दिल्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र गुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोंगडे, पोलीस उप निरीक्षक दीपक पाटील, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अजित पालकर व त्यांच्या टीम ने घरफोडीच्या गुन्ह्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता , पोलीस हवालदार दयानंद नाईक यांना गोपनीय माहिती मिळाली.
हा गुन्हा रफिक मेहबूब शेख, उर्फ रफिक बाटला वय 40 वर्ष धंदा भंगार खरेदी विक्री राहणार जुम्मा मस्जिदच्या पाठीमागे राबोडी, रमेश कुंवर राम वय 30 वर्ष धंदा रिक्षा चालक राहणार कॅशर मिल ठाणे, अंजुम इब्राहिम शेख वय 40 वर्ष धंदा चालक राहणार शहा महंम्मद टांगेवला चाळ, राबोडी यांनी केलेला आहे. या वरून त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली, त्यांच्या कडून पोलिसांनी तपासात 4500/- रुपये रोख रक्कम हस्तगत केली. घरफोडीच्या गुन्ह्यात रफिक आणि रमेश यांच्या घराची झडती घेतली असता , त्या मध्ये दोन रीव्होलवर व दोन जिवंत राउंड सापडले. त्यांच्या कडे कसून चौकशी केली असता त्यांनी किराणा व्यापारवर त्यांचेकडील रोख रक्कम लुटण्याच्या उद्धेशाने फायरिंग केल्याचे कबुक केले. त्यातच त्यांच्या कडे मिळालेल्या जिवंत राउंड व या गुन्ह्यात मिळालेली रिकामी पुंगळी सारखीच असल्याचे निष्पन्न झाले. यातील आरोपी अंजुन याने व्यापारी दुकानातून रोख रक्कम बाईकवरून कधी घेऊन जातो, याची माहिती आरोपी 1 व 2 यांना पुरवत होता.
अशा प्रकारे हा गुन्हा तिघांनी संगनमताने केल्याचे निष्पन्न झाले. या आरोपिंकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले. त्यांच्या कडून दोन रिव्होलवर , रुपये 57,350 घरफोडीच्या गुन्ह्यातील 4,500/- रुपये गुन्हा करताना वापरलेली होंडा सिटी 1,20,000रुपये असा ऐकून 1,81,850/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.