डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग प्र.क. ११४ भोपर येथील येथील वेशीमाता स्मशानभुमीची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे. तसेच स्मशानभुमीची पत्रे, एंगल यांना गंज लागून सडल्याने सदरची स्मशानभुमी कधीही ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मयतावर अंत्यसंस्कार होत असतांना स्मशानभुमीच्या दुराव्स्तेमुळे काही अपघात घडल्यास तेथील उपस्थित लोकांच्या जिवावर बेतून जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच अनुषन्गाने प्रभाग प्र.क. ११४ भोपर येथील कार्यकुशल माजी नगरसेविका सौ . रविना अमर माळी यांनी पालिका प्रशासनाला पत्र देऊन पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. माजी नगरसेविका सौ . रविना अमर माळी ह्या नेहमीच प्रभागातील समस्यांवर लक्ष ठेऊन असतात .
त्यामुळे सदर स्मशानभुमीची दुरूस्ती अथवा नविन स्मशानभुमी बांधण्यातबाबत तातडीने निर्णय घेवून पालिका प्रशासनाने वेशीमाता परिसरातील रहिवास्यांना न्याय द्यावा अशी मागणी सौ . माळी यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे .