ठाणे

शहापूर तहसील कार्यालयातील तलाठी व कोतवालास पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक, वांरवारच्या घटनामुळे तहसील कार्यालय बदनाम ?

कल्याण (संजय कांबळे) : काही महिन्यापूर्वी वनविभागाचा लिपिक व महसूल विभागातील तलाठी यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना ताजी असतानाच सरत्या वर्षाला कल्याण तालुक्यातील एका व्यक्तीच्या तक्रारीवरुन तहसील कार्यालयातील शिपाई मिलिंद नारायण राऊत यांनी अडिच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तर खाजगी इसम ओमकार रमेश राऊत यांनी तीन लाख रुपये मागितल्याने यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असतानाच आता पुन्हा या कार्यालयातंर्गत येणाऱ्या धस ई तलाठी सजेचे तलाठी धनजंय राजेंद्र शेटकर व कोतवाल मल्हारी परसू भेरे या दोघांना ५०हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या सततच्या लाचखोरी मुळे शहापूर तहसील कार्यालय कमालीचे’बदनाम, होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असेकी,शहापूर डोलखांब रस्त्यावरील धस ई तलाठी सजेचे तलाठी व अतिरिक्त महसूल सहाय्यक म्हणून पदभार स्विकारले ले धनजंय राजेंद्र शेटकर व कोतवाल मल्हारी परसू भेरे यांनी तक्रारदार याच्या आईच्या नावे असलेली जमीन रेल्वे प्रोजेक्ट मध्ये जात असल्याने ती शासनाकडून संपादित करण्यात आली आहे. तीची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी तक्रारदार यांच्या आईच्या नावाचा वास्तव्याचा दाखला तहसील कार्यालयातून वरीष्ठांना अनुकूल अशा अहवालानुसार पाठविण्यासाठी या दोघांनी६०हजार रुपयांची मागणी तक्रारदार यांच्या कडे केली होती. यातील ५०हजार रुपये स्विकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने यांना रंगेहात पकडले.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी वनविभागाचा लिपिक तसेच महसूल विभागाचा तलाठी यांना भ्रष्टाचार प्रकरणी बेड्या ठोकल्या होत्या. तर २०२२या सरत्या वर्षाला कल्याण तालुक्यातील नांदप गावचे विनोद शेलार यांनी शहापूर तहसील कार्यालयात दाखल केलेल्या खटला क्रमांक४७/२०२१ मध्ये तक्रारदार, आई,मामा, मावशी यांच्या बाजूने निकाल व प्रत देण्यासाठी तहसील कार्यालयातील शिपाई मिलिंद नारायण राऊत याने अडीच लाख रुपयांची लाच मागीतली होती. तर याच विभागाशी अंत्यत जवळचे संबंध असणारा खाजगी व्यक्ती ओमकार रमेश पातकर याने ३लाख रुपये मागितले होते. या दोघांच्या विरोधात शेलार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्याची चौकशी सुरू असतानाच आता तलाठी व कोतवाल लाच घेताना सापडले आहेत.
तथपूर्वी शहापूर तहसील कार्यालय हे भ्रष्टाचाराचे कुरन बनले असून केवळ पैशासाठी ३/४वर्षे प्रकरणे पेंडिग ठेवली असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. हा सर्व गोरखधंदा सांयकाळी सुरू होतो असेही काहींनी सांगितले.

अशा सततच्या भ्रष्टाचारामुळे शहापूर तहसीलदारांची उचलबांगडी होणार अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक स्वप्नील जुईकर, पोहवा परदेशी, विक्रम फडतरे, शशीम शेख,प्रंशात मोरे, चालक पो शिपाई त्रिभुवन यांनी ठाणे एसीबी परिक्षैत्राचे पोलीस अधीक्षक सुनील लोंखडे,अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक एसीबी ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!