ठाणे, दि.16 : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व मानवी जीवनाच्या सुरक्षिततेला व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ नये. यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पूर्व परवानगीशिवाय रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रीत क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणास 19 जानेवारी 2023 ते 19 मार्च 2023 या कालावधीत बंदी घालण्यात आली असल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखाचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.
यासंबंधी या आदेशानुसार, पोलीस सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रीत क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणास 60 दिवसांसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट ड्रोनद्वारे हवाई निगराणी करण्यास ठाणे शहर पोलीसांना परवानगी देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही या आदेशात नमूद केले आहे.