ठाणे : ठाणे तालुक्यातील मोठी देसाई गाव येथे राहणाऱ्या वनिता नारायण देवकर यांच्यावर गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी रात्री १ वाजता काळाने अचानक झडप घातली.
अतिशय शांत , सयंमी व मनमिळावू स्वभाव अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या अचानक जाण्याने देवकर व पाटील कुटुंबीय तसेच मोठी देसाई गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पती नारायण देवकर , मुलगा आकाश देवकर , तसेच मुलगी मेघना अजिंक्य उलवेकर नातवंडे असा परिवार आहे. मोठी देसाई गावातील स्मशानभूमीत सकाळी ९ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक २८ जानेवारी २०२३ सकाळी ९ वाजता मोठी देसाई खाडीवरील गणेश घाट येथे होणार असून उत्तरकार्य तथा तेरावा विधी दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी मोठी देसाई येथील राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले .