भिवंडी ( प्रतिनिधी मिलिंद जाधव ): आगरी साहित्य विकास मंडळ भिवंडी आगरी महोत्सव आयोजित २० वे दिवसीय अखिल भारतीय आगरी साहित्य संमेलनाचे आयोजन भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे कै. बाबुलनाथ नाईक साहित्य नगरीत दोन दिवस संपन्न झालेले ‘ आगरी महोत्सवामध्ये आगरी साहित्य संमेलन व भव्यदिव्य ग्रंथदिंडी उपक्रमाची सर्वच ठिकाणी स्तुती होत आहे.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी भिवंडीतील जेष्ठ कवी सुनील पाटील होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. आगरी बोली भाषेचे जतन व संवर्धन ही साहित्यिकांसोबत समाजाचीही जबाबदारी आहे.असे संमेलनाध्यक्ष सुनील पाटील यांनी बोलतांना सांगितले.
यावेळी भिवंडी आगरी महोत्सव संस्थापक अध्यक्ष विशु भाऊ म्हात्रे , संमेलन स्वागताध्यक्ष रुपेश म्हात्रे, ज्येष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे, मोहन भोईर , दमयंती भोईर , पुंडलिक म्हात्रे , चंद्रकांत मढवी , कैलास पिंगळे , रामनाथ म्हात्रे आदी मान्यवर संमेलनास उपस्थित होते.
सदर संमेलनाचे उद्घाटन अरूण म्हात्रे यांच्या हस्ते आगरी साहित्य विकास मंडळाची ‘ आगोट ‘ ही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. गायक संतोष चौधरी (दादुस),साधना नाईक,दया नाईक,रामनाथ म्हात्रे याांनी आगरी बोली भाषेतील गाणी सादर केली.सिने नाट्य कलाकार मयुरेश कोटकर यांनी आगरी साहित्य विकासासाठी महत्त्व द्यावे असे मत परिसंवादात व्यक्त केले.कार्यवाह भगवान ठाकूर , ओमभाऊ मुकादम तसेच संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे , रवींद्र तरे मनोहर तरे यांचे संमेलनास विशेष सहकार्य लाभले.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे होते. मोहन भोईर, विश्वास कळे, मयुरेश कोटकर,यांचं साहभाग होता. तर सूत्रसंचालन निर्मला पाटील यांनी केले.
‘लोककला व कै. बाबुलनाथ नाईक यांचे लोककलात्मक योगदान ‘या सत्राच्या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष सुनील पाटील होते. यावेळी संतोष चौधरी (दादूस), संदेश भोईर,रामनाथ म्हात्रे, दया नाईक, विजय नाईक, साधना पाटील (नाईक) सहभागी झाले होते. “आगरी बोली आणि आगरी समाज” या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. चंद्रकांत मढवी होते .रामनाथ म्हात्रे ,दमयंती भोईर, गजानन पाटील, सर्वेश तरे, संदिप पाटील, डॉ. शोभा पाटील, गजानन पाटील साहभागी झाले होते. तर सूत्रसंचालन शामकांत नवाळे यांनी केले.
तर यावेळी कवी संमेलन हरिश्चंद्र चौधरी, दया नाईक, निर्मला पाटील बाजीराव पाटील, श्रीराम पाटील, , गजानन पाटील, सुरेश मुकादम, ज्ञानेश्वर चिकणे, योगेश चिकणे दशरथ मुकादम,सर्वेश तरे, माधव गुरव, मंगेश म्हात्रे, श्रीकांत पाटील, अॅड. मनोज म्हात्रे ,रामनाथ म्हात्रे,संजय गगे,मिलिंद जाधव,मनीषा गामणे,श्रध्दा पाटील, संदीप कांबळे ,सूर्यकांत नवाळे, भगवान गायकवाड यांचा सहभाग होता.
संमेलनात सुनील पाटील यांचा “तेथे कर माझे जुळती” विश्वास थळे यांचं “मोगरा फुलला” दया नाईक यांचं “पिरमाचा मोरपीस” दशरथ मुकादम यांचं “आठवण’ श्रीराम पाटील यांचा “साद” श्याम माळी यांंचं “आगरवाट” योगेश चिकणे यांचं ” आगरी उखााणे” या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.