डोंबिवली ( शंकर जाधव ) : क्रीडा व युवक सेवा संचनालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,जळगाव व जिल्हा क्रीडा परिषद,जळगाव यांच्या वतीने जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज, जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा २०२२-२३ मध्ये डोंबिवलीतील धनाजी नानाजी चौधरी ( डीएनसी ) शाळेतील अनिरुद्ध पोलावाड याने दुसरा क्रमांक पटकाविला.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुख शेख,जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित व मुख्य पंच स्वप्नील बनसोडे यांच्या हस्ते पोलावाड यांना पारितोषिक देण्यात आले.व्यासपीठावर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव अंकुश रक्तादे,अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे नंदलाल गादिया, अॅड.अंजली कुलकर्णी,जैन स्पोर्ट्स अॅकडमीचे अरविंद देशपांडे, प्रवीण ठाकरे,रविंद्र धर्माधिकारी, संजय पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना आणि खेळाडू वृतीला वाव देण्याचे दिला जात असल्याचे शाळेचे ट्रस्टी सुरेश महाजन यांनी सांगितले.
मुख्याध्यापक बी.आर परदेशी, वर्गशिक्षिका आर. ए. पांडे, उपप्राचार्य सीमा इंदुलकर, शारीरिक शिक्ष भूषण संख्ये, बरकळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.