नवी मुंबई महाराष्ट्र

शाळांनी शिवजयंती, मराठी भाषा दिन साजरा करावा तसेच महाराष्ट्र गीत शाळेत दररोज स्पीकर वरून म्हणावे ; मनविसेचे सीवूड्स मधील शाळांना पत्र

नवी मुंबई : अखंड हिंदुस्थानची ज्या राजामुळे ओळख निर्माण झाली असे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा अशी आपली समृद्ध मराठी भाषा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी व मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. त्यामुळे या दोन दिवसां संदर्भातील माहिती व्यापक स्तरावर पोहचवणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे व मनसे शहर सचिव सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली डॉन बॉस्को, डी ए व्ही स्कूल, एस एस हायस्कूल, डी पी एस स्कूल, पोद्दार स्कूल या शाळांच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली. हे दोन दिवस साजरे का करावे, या संबंधीची प्रेरणा, या दिवसांचे वर्णन करणारे माहितीपर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करण्यात यावे अशी विनंती शाळेच्या मुख्याध्यापकांना केली. या संदर्भातील पत्र मनविसे सीवूड्स विभाग अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी शाळा प्रशासनाला दिले.

त्याच बरोबर महाराष्ट्र सरकारतर्फे नव्याने घोषित झालेल्या आणि प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे महाराष्ट्राचे राज्यगीत “जय जय महाराष्ट्र माझा” याची धुनही दररोज शाळेत / महाविद्यालयात ध्वनीक्षेपकसह वाजविण्यात यावी अशी विनंती मनसे शिष्टमंडळाने शाळा मुख्याध्यापकांना केली. मनसेच्या शिष्टमंडळात मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, मनसे शहर सचिव सचिन कदम, मनविसे उप शहर अध्यक्ष प्रतिक खेडेकर, मनविसे विभागअध्यक्ष अविनाश शिंदे, मनसे उप विभागअध्यक्ष नरहरी कुंभार, मनसे शाखाअध्यक्ष दिलीप पाटील, मनविसे उप विभागअध्यक्ष गणेश वाघमारे, मयंक घोरपडे, अमित टोंपे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!