मुंबई

ब्लूम आणि मकरंद नार्वेकर यांनी कुलाब्यातील नागरिकांसाठी घेतले मोफत आरोग्य शिबिर

मुंबई, ता. 16 (बातमीदार) – कुलाब्यातील प्रभाग क्र 227 मच्छीमार नगर येथे ब्लूम आणि मकरंद नार्वेकर यांनी तेथील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते.  या आरोग्य शिबिरात त्या परिसरातील 500 हून जास्त नागरिकांची चार डॉक्टरांनी आरोग्य तापसणी केली. 

आरोग्य शिबिराचे उद्दिष्ट “समाजाला परत फेड करणे”, होमिओपॅथीच्या फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करुन समाजामध्ये संपूर्ण आरोग्यच्या निरोगीपणाला प्रोत्साहन देणे हे होते. हा कार्यक्रम सकाळी सुरू झाला जो दिवसाच्या शेवटपर्यंत चालू होता. ज्यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत स्थानिक नागरिक शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, रोगप्रतिकारशक्ती, अपचन, फ्लू, खोकला, सर्दी आणि शरीरदुखी यावर तज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांसोबत सल्लामसलत, चेअकप आणि रुग्णांना मोफत होमिओपॅथिक औषधांचे वाटप करण्यात आले.

यावर बोलताना प्रणव बत्रा (ब्लूमचे एमडी) म्हणाले, “जीवनात तुम्ही दुसऱ्याला दिलेले परत फिरुन तुमच्या कडे येते. त्यामुळे सगळ्यांना तुमच्याकडे जे सर्वोत्तम आहे ते द्या तरच पुन्हा सर्वोत्तम तुमच्याकडे परत येईल” हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. पूर्णपणे दुष्परिणामांपासून मुक्त असलेल्या होमिओपॅथी औषधांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करताना समाजाला चांगली ओषधे द्या. तरच त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल. यावेळी कुलाब्यातील रहिवाशांनी चांगल्या प्रकारे सहकार्य देऊन आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद दिला. आम्ही मकरंद सरांचे आभार मानू इच्छितो जे समविचारी आणि लोकांसाठी एका उदात्त हेतूसाठी नेहमी सहकार्य करण्यास तयार असतात. या शिबिरासाठी त्यांनी आम्हाला मदत केली. होमिओपॅथीच्या फायद्यांबद्दल आम्ही लोकांना शिक्षित आणि जागरूक करू शकू, अशा आणखी शिबिरे घेऊन येण्याचे आम्ही वचन देतो.”
यावेळी मकरंद नार्वेकर म्हणाले, “लोकांसाठी काम केल्याने मला नेहमीच खूप आनंद मिळतो. कुलाब्यातील रहिवाशांनी घेतलेला हा आरोग्य शिबिराचा लाभ खुप चांगला आहे. मला आनंद आहे की या उपक्रमाचा लोकांना फायदा झाला. अशा आणखी उपक्रमांवर काम करण्यास उत्सुक आहे.”

या आरोग्य शिबिराचे स्थानिक समुदायाने खूप कौतुक केले आणि अधिवक्ता मकरंद नार्वेकर यांच्या सहकार्याने प्रणव बत्रा आणि ब्लूमच्या टीमने घेतलेल्या पुढाकाराबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमामुळे लोकांना केवळ दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत झाली नाही तर त्यांना होमिओपॅथीच्या फायद्यांविषयीही माहिती मिळाली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!