डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार राष्ट्रीय धर्माचार्य विश्वगुरु सन्मानित ह.भ.प.नामदेव महाराज हरड यांचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान माऊली समाधी मंदिर विणा मंडपात सोहळयाचे मालक स्व.निवृत्ती बाबा हरफळकर पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या किर्तन महोत्सवा प्रसंगी माऊली समाधी संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी हभप नामदेव महाराज हरड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व जमलेल्या वारकरी समुदायाला मार्गदर्शन केले.
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान माऊली समाधी मंदिरात सोहळ्याचे मालक स्व.ह.भ.प.निवृत्तीनाथ हरफळकर बाबा पुण्यतिथी निमित्त नुकताच हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता या महोत्सवाच्या पाचव्या दिवसाची सेवा राष्ट्रीय धर्माचार्य विश्वगुरु सन्मानित ह.भ.प. नामदेव महाराज हरड यांची किर्तन सेवा संपन्न झाली.
जगदगुरू शंकराचार्य काशी धर्मपीठ यांच्या वतीने अनेक मान्यवर कीर्तनकाराना गौरविण्यात आले.यावेळी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय वरिष्ठ संत उपस्थित होते.याप्रसंगी राष्ट्रीय धर्माचार्य गुरु आर एच सोनीजी यांचे स्नेही राष्ट्रीय धर्माचार्य कथाकार प.पु.राजकुमार द्विवेदी उर्फ ब्रजकिशोरचंद्र शास्त्री बिहार यांना माऊली समाधी मंदिरात महासन्मान पत्र सुपुर्त करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचे चोपदार ह.भ.प.चैतन्य महाराज कबिर.स्वामी लोकनाथगिरीजी महाराज यांचे शिष्य स्वामी समाधानगिरीजी महाराज., ह.भ.प.माधव महाराज ईगोंळे, ह.भ.प.तुकाराम महाराज श्रीदत्त संस्थान वाकड पुणे जालना येथील .भागवताचार्य ह.भ.प.एकनाथ महाराज आळंदीकर आदी मान्यवर जेष्ठ कीर्तनकारानी धर्माचार्य नामदेव महाराज हरड यांच्या कार्याची प्रशंसा केली व त्यांना आगामी काळात होवू घातलेल्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान माऊली समाधी मंदिरात सन्मान होणे हे माझे भाग्य आहे. आजवर अनेक सन्मान ,सत्कार झाले पण हा सन्मान माझ्या आयुष्यातील अनमोल क्षण असल्याचे हभप नामदेव महाराज यांनी यावेळी सांगितले. महोत्सवात ह.भ.प.बजरंग महाराज करजुले नगर.कुऱ्हाडे पाटील ह.भ.प.वामन बाबा गटे मंचरकर. ह.भ.प.गणेश औटी जामगाकर. आळंदी वारकरी संप्रदाय संत प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.