डोंबिवली ( शंकर जाधव ) : भाजप नेते देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी संलग्न भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीच्या डोंबिवली शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी सरचिटणीस शिवाजी आव्हाड, भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष विजय सरोज, उपाध्यक्ष सुनील हूस्के , उपाध्यक्ष संजय रणदिवे, महाराष्ट्र प्रदेश संघटक रविंद्र महाडिक आणि पत्रकार प्राध्यापक दीपक जाधव उपस्थित होते.
डोंबिवली शहर कार्यकारिणीत शहर अध्यक्षपदी शर्मिला केसरकर, शहर सरचिटणीसपदी सतीश अटकेकर, आशुतोष वरणगावकर, शहर उपाध्यक्षपदी दुर्गराज जोशी,अरविंद सुर्वे, चिटणीसपदी दीपक नाईक, प्रसाद गाडगीळ, प्रथमेश वैद्य, संपर्कप्रमुखपदी सतीश कांबळे ,मीडिया प्रसिद्धी प्रमुखपदी निलेश परब त सदस्यपदी कीर्ती वरणगावकर, ज्योती मराठे, गणेश मांजरेकर, चंद्रशेखर मराठे अशी डोंबिवली शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात रवींद्र महाडिक यांनी गीत गाऊन केली. कार्यक्रमात संजयजी केणेकर, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि गणेश ताठे, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजपा कामगार आघाडी यांचे मार्गदर्शन कायम मिळत राहील अशी आशा व्यक्त करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी डोंबिवली शहर कार्यकारणीचे अभिनंदन केले. सतीश कांबळे यांनी डोंबिवली चित्रपट कामगार आघाडी कार्यकारिणीच्या वतीने जास्तीत जास्त जोमाने काम करू अशी ग्वाही दिली.
कार्यकारणी मध्ये अनेक कलाकार गायक, गायिका, नाट्य कलाकार, सिने कलाकार तसेच व्यावसायिक असल्याने सध्याच्या कार्यकारिणीला अनेक पैलू असलेली व्यक्तिमत्व मिळालेली आहेत त्याबद्दल विजय सरोज, शिवाजी आव्हाड, संजय रणदिवे, सुनील हुस्के यांनी समाधान व्यक्त केले.डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात डोंबिवलीतील विनय डांगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडल अध्यक्ष प्रदीप चौधरी, सरचिटणीस समीर चिटणीस यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी विनय डांगे यांनी सांभाळली.