ठाणे

ग्रा.पं. नारीवली सरपंच पदी आशा नामदेव भोईर यांची बिनविरोध निवड

मुरबाड दि: 28 : मुरबाड तालुक्यातील एक महत्वाची ग्रामपंचायत नारीवली येथील ठरल्याप्रमाणे मागील सरपंच गणेश बांगर यांनी राजीनामा दिला होता. दि.27 मार्च 2023 रोजी सरपंच पदी निवडीच्या दिवशी आशा नामदेव भोईर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची ग्रा.पं.नारीवली सरपंच पदी बिनविरोध निवड झाली.

यावेळी उल्हास बांगर (जि.प.सदस्य), यांनी व सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी राजाराम बांगर, जीवन बांगर, भागोजी भोईर, यशवंत चोधरी , तातू भोईर, तानाजी भोईर, सोमनाथ बांगर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी नवनिर्वाचित सरपंच आशा नामदेव भोईर यांनी गांवाच्या सर्वांगीण विकासासाठी
शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा करु असं आपल्या मनोगत सांगितले. उपसरपंच दयानंद भोईर यांनी सर्वांचे आभार मानले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!