गुन्हे वृत्त

सोनसाखळी चोरटे गजाआड.. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी

डोंबिवली ( शंकर जाधव ) : ठाणे जिल्हयातील विविध परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पसार झालेल्या चार चोरट्यांना अटक करून गजाआड करण्यास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. सोनसाखळी चोरी केलेले व  फसवणुक केलेले असे एकुण सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.अटक केलेल्या चोरत्यांकडून  ७ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोबाईल फोन तसेच गुन्हयात वापरलेले हत्यार चाकु व रोख रक्कम असे एकुण ५,१५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान उर्फ राजकपुर असदउल्ला इराणी ( २३ वर्षे ‘रा. ग्रेट मराठा बिल्डींगचे बाजुला, पाटीलनगर, भास्कर शाळेच्या जवळ आंबिवली ), हसन अजिज सय्यद ( २४ वर्षे रा. अबुतालीब मस्जिदच्या बाजुला पाटीलनगर भास्करशाळेच्या बाजुला आंबिवली ),सावर रजा सय्यद इराणी ( ३५ वर्षे रा. स्टार बेकरी, जवळ पाटील नगर, आंबिवली ) आणि मस्तान अली दुदानअली इराणी ( ४६ वर्षे रा. मालवाडी झोपडपटट्टी ७ वी गल्ली राजीव गांधीनगर, जयसिंगपुर ता. शिरोळा, जि. कोल्हापुर ) अशी अटक केलेल्या चोरट्यांनी नावे आहेत.कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोउनि मोहन कळमकर व अंमलदार यांनी सापळा लावुन चोरट्यांना अटक केली.

    ठाणे शहर आयुक्तालयात सोनसाखळी चोरीचे गुन्हयात वाढ झाल्याने  गुन्हे उघडकीस आणण्याचे संबंधाने अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) ठाणे शहर अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, निलेश सोनावणे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा निलेश सोनावणे यांनी विशेष मोहिम राबविण्याबाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या  होत्या. वपोनि  किशोर शिरसाठ यांनी पोलीस अधिकारी व अमलंदार यांचे विशेष पथक स्थापन करून  वरिष्ठांनी दिलेल्या सुचना पो. हवा. प्रशांत वानखेडे यांना माहिती मिळाली होती की सोनसाखळी चोरटे बनेली टिटवाळा परिसरात येणार आहेत. पोउनि मोहन कळमकर व अमलदार यांनी सापळा लावुन चोरट्यांना पकडले.   

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, सहा.पो.उप निरी. संजय माळी, पोहवा प्रशांत वानखेडे, अनुप कामत, बालाजी शिंदे, विश्वास माने, बापुराव जाधव, गोरखनाथ पोटे,  विलास कडु, प्रविण बागुल, ल किशोर पाटील, रमाकांत पाटील, प्रविण जाधव, उल्हास खंडारे, अमोल बोरकर,मेघा जाने, पोना श्रीधर हुंडेकरी, सचिन वानखेडे, पोशि गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, उमेश जाधव, गोरक्ष शेकडे,  विनोद चन्ने, मंगला गावित यांनी केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!