गुन्हे वृत्त

MPSC चे हॉल तिकीट व्हायरल करणारा आरोपी अखेर अटकेत; नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरून अनेक परिक्षार्थीचे हॉल तिकीट बेकायदेशीररित्या प्रसारीत करणाऱ्या आरोपीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. रोहित कांबळे असे या अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून महत्वाचे साहित्यही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 30 एप्रिल रोजी विविध अराजपत्रीत गटासाठी झालेल्या पूर्व परीक्षेच्या परीक्षार्थींचे प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणावर परिक्षार्थींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याबाबत महत्वाची बातमी समोर आली असून परिक्षार्थीचे हॉल तिकीट टेलीग्राम चॅनेलवर प्रसारीत करणाऱ्या तरुणास सायबर पोलिसांनी पुण्यातून पोलिसांनी अटक केली आहे.

अटक केलेल्या रोहित कांबळे या तरुणाने लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर टाकलेल्या बाह्य लिंक मध्ये बेकायदेशीर प्रवेश करून तब्बल 94,195 परीक्षार्थिंचे हॉल तिकीट प्राप्त करुन “MPSC 2023 A” या टेलीग्राम चॅनेलवर बेकायदेशीररित्या प्रसारीत केले होते. नवी मुंबई सायबर पोलीसांनी गुन्हा करताना वापरलेला आय. पी. ॲड्रेस शोधून काढत तांत्रिक माहितीच्या आधारे रोहित कांबळे याला पुणे येथून अटक केली. 

सायबर पोलीसांनी आरोपीच्या राहत्या घरातून गुन्हयात वापरलेला 1 डेस्कटॉप, 1 लॅपटॉप, 3 मोबाईल फोन आणि 1 इंटरनेट राउटर देखील हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्यांची कबुली रोहित कांबळे या आरोपीने दिली असून त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!