कोकण महाराष्ट्र

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून 37 लाखांची मदत

अलिबाग : कोरोना मुकाबला करणार्‍या सरकारला डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यावतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. प्रतिष्ठानतर्फे 37 लाख रुपयांची मदत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान सहाय्यता निधीकरिता 16 लाख रूपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता 16 लाख रुपये व जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगडकरिता 5 लाख रुपये असे एकूण 37 लाख रूपयांचे डिमांड ड्राफ्ट जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आले. यावेळी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे उमेशदादा धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!