क्रिडा

क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य राज्यसुवर्ण महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय परिसंवाद संपन्न  ; क्रीडामंत्री यांनीही दिल्या शुभेच्छा !!

कल्याण : – महाराष्ट्र शासनाच्या,  क्रीडा व युवक सेवा संचालनालय खात्याला ५० वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाच्या   रविवार दि. २६ जुलै २०२० रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत आॅनलाईन राज्यस्तरीय परिसंवादाचे संपन्न झाला.. राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनीही या परिसंवाद ला शुभेच्छा दिल्या..
राज्यातील 1400 क्रीडाप्रेमींनी या परिसंवादांमध्ये फेसबुक लाईव्ह मीटिंग च्या द्वारे सहभाग घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला.. “शालेय क्रीडा स्पर्धांचे स्वरुप बदलणे – काळाची गरज” या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. परिसंवादामध्ये बोलताना प्रमोद चांदुरकर – भारतीय धनुर्विद्या सचिव अमरावती यांनी नवीन नवीन खेळांना प्रोत्साहन देणे व खेळाच्या आयोजन तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत योग्य पद्धतीने व्हावे यावर भर दिला त्यासाठी संघटना सर्वतोपरी मदत करेल असे सागितले, तसेच नामदेव शिरगावकर – सहसचिव  भारतीय आॅलिंपिक महासंघाचे  यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन च्या वतीने राज्य ऑलम्पिक स्पर्धा व जिल्हा ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा आम्ही विचार करत असून लवकरच ह्या स्पर्धाही सुरू करू  तसेच केंद्रीय क्रीडा विभागाप्रमाणे प्रमाणे शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग वेगवेगळ्या करण्यावर भर दिला जाईल..असे सागितले..तर महाराष्ट्र ऑलम्पिक चे सदस्य अशोक दुधारे, नाशिक यांनी राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या संघटक व कार्यकर्त्यांनाही शिवछत्रपती राज्य पुरस्कार पुन्हा सुरू करावा यावर भर दिला परिसंवादात वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातील खेळाडू पालक मार्गदर्शक शिक्षक क्रीडा कार्यकर्ते व संघटक सहभागी झाले होते
यामध्ये प्रामुख्याने   नाशिक क्रीडाधिकारी रविंद्र नाईक,  जेष्ठ क्रीडा पत्रकार पुणे – शिवाजी गोरे, डॉ.उदय डोंगरे क्रीडा मार्गदर्शक, औरंगाबाद, अभय बिराज प्राध्यापक सांगली,  पीयूष अंबुलकर,नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी,परमेश्र्वर मोरे  पालक प्रतिनिधी उस्मानाबाद, सागर गुल्हाने खेळाडू प्रतिनिधी वाशिम, येथून आदी क्रीडा मान्यवरांनी यात सहभाग घेतला.परिसंवादाचे आयोजन कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण इंगळे, कार्याध्यक्ष उदय नाईक, कार्यवाह राजेंद्र शेटे, क्रीडा शिक्षक गजानन वाघ, क्रीडा पत्रकार अविनाश ओंबासे,  क्रीडाचे तांत्रिक जाणकार गुणेश सर व राज्यस्तरीय परिसंवादाचे समन्वयक व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी अंकुर आहेर यानी केले होते

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!