मुंबई

मुंबईत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; सोन्याचे भाव सर्वसामन्याच्या आवाक्या बाहेर.!

मुंबई : सोन्याचा दर दिवसेंदिवस नवा रोकॉर्ड करत आहे. देशभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे सर्वच आर्थिक व्यवहारांवर त्याचा परिणाम होत आहे. मुंबईमध्ये देखील सोन्याच्या किंमतीमध्ये खूप जास्त वाढ होत आहे. सोन्याच्या दराने आज उच्चांक गाठला आहे. मुंबईमध्ये सोन्याचे भाव प्रति तोळा जीएसटीसह ५४ हजार ८२८ रूपये झाले आहे.
२४ तासात सोन्याचा दर तब्बल ३ हजाराने वाढले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर आजपर्यंतच्या विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. दिवाळीपर्यंत सोन्याचे दर आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नवी दिल्लीतील सराफा बाजारात देखील सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा ९०५ रुपयांनी वाढले होते. यानंतर सोन्याचे भाव ५२,९६० रुपये प्रति तोळा झाले आहे.
चांदीच्या भावात घसरण
चांदीचे भाव सोमवारी उतरले आहेत. चांदीमध्ये मोठी घसरण झाली आहे. चांदी प्रति किलो ३,३४७ रूपयांनी कमी झाल्यामुळे काल चांदीचे भाव ६५,६७० रूपये प्रति किलो होते. कोरोनाच्या संकटकाळात गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढला आहे. सोन्याचांदीमध्ये केलेलीगुंतवणूक नेहमीच सुरक्षित मानण्यात येते. त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!