महाराष्ट्र

मोखाडा तालुक्यातील हजारो शेतकरी पिक विम्यापासून वंचित रहाणार  ?

मुदत वाढवून देण्याची मागणी ; लॉकडाऊन + नेटडाऊन मुळे खोळंबा
मोखाडा ( दीपक गायकवाड) :  मोखाडा तालुक्यात 14 हजाराहून अधिक शेतकरी आहेत. परंतु पीककर्ज लाभधारक
 शेतक-यांव्यतिरिक्त बिगर कर्जदार शेतक-यांचा भरणाच अधिक असल्याने सदर शेतकरीच पिक विम्याला पारखे होणार आहेत. त्यातच यंदाच्या शेती हंगामात पावसाचे प्रमाण 50% पेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे पिक परिस्थिती यथातथाच राहिली तर हजारो शेतक-यांचे नुकसान होणार असल्याने पिक विम्याची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
मोखाडा तालुक्यात खोडाळा विभागातून सहकारी संस्थेमार्फत 435 लाभार्थ्यांना 1 कोटी 3 लाख 9 हजार तर मोखाडा विभागात  701 लाभार्थ्यांना  1 कोटी  52 लाख  57 हजार असे एकूण 1136 लाभार्थ्यांना  2 कोटी  55 लाख  66 हजार ईतके पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. शासनाच्या धोरणानुसार पिक कर्जातून पिक विमा काढला जात असल्याने केवळ 1136 लाभार्थ्यांनाच पिक विम्याचा लाभ मिळाला असून बिगर कर्जदार शेतकरी सरसकट पिकविम्या पासून वंचित रहाणार आहेत.
मोखाडा तालुक्यात वरई खाली 4208 , नागली खाली  4718 ,  भात पिकाचे 2060 , उडीद 1000 , तर ईतर कडधान्य 10000 ईतके क्षेत्र पिका खाली असून पिक कर्जाधारीत पिक विमा घेतलेले  1136 शेतकरी वगळले तर तब्बल 13 हजाराहून अधिक शेतकरी हे केवळ लॉकडाऊन ईंटरनेट अभावी सातत्याने उद्भवणाऱ्या साईट डाऊन मुळे पिक विम्या पासून वंचित राहणार असल्याने पिक विम्याची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!